मुंबई : सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणाºया म्हाडाचा २०१८-१९ सालचा ६ हजार ७८९.५१ कोटींचा अर्थसंकल्प सोमवारी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात १५ हजार ४३० घरांच्या बांधकामांकरिता ४ हजार ३९८.२५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या माध्यमातून २०१७-१८ मध्ये ८५० मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती करण्यात आली आहे. पुढील वर्षी ९४७ इमारतींची दुरुस्ती करण्यात येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे लॉटरी काढलेल्या इमारतींच्या वितरणापोटी, मुंबईसह राज्यातून चालू वर्षी ७४१ कोटी रक्कम घरांच्या विक्रीतून वसूल झाली आहे. पुणे, कोकण मंडळाकडे निर्माण झालेल्या घरांच्या विक्रीतून २०१८-१९ साली राज्यातून सुमारे ३ हजार ९६६ कोटी प्राप्त होतील.राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना अंतर्गत, ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना कर्जावरील व्याजाच्या अनुदानासाठी १५ कोटींची तरतूद आहे. पुढील वर्षासाठी २५.८५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतींच्या देखभाल व दुरुस्तीसाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील झोपडीधारकांचे जीवनमान उंचावण्याचा म्हाडाचा प्रयत्न असणार आहे.
म्हाडाच्या घरांसाठी ४ हजार ३९८ कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 6:02 AM