Join us

नाल्यातील गाळ काढण्यासाठी कोट्यवधींची तरतूद

By admin | Published: August 17, 2016 4:08 AM

पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी नाल्यांचे रुंदीकरण गरजेचे झाले आहे़ ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत ही कामे गेली काही वर्षे सुरू आहेत़ अशा तीन नाल्यांच्या

मुंबई : पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी नाल्यांचे रुंदीकरण गरजेचे झाले आहे़ ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत ही कामे गेली काही वर्षे सुरू आहेत़ अशा तीन नाल्यांच्या रुंदीकरणासाठी तब्बल ७३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी शुक्रवारी सादर होणार आहे़ ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईतील नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण सुरू आहे़ मात्र, २००६ पासून रखडलेल्या या प्रकल्पाचा खर्च कोटी-कोटीने वाढत चालला आहे़ अशाच तीन नाल्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर प्रशासनाने आणला आहे़ यामध्ये आझमीनगर येथे उगम पावून मालाड खाडीत विसर्जित होणारा मालवणी नाला, बिंबीसार नगरचा रॉयल पाम नाला आणि बोरीवलीच्या चंदावरकर नाल्याचा समावेश आहे़२००५ मध्ये मुंबईत आलेल्या पुराचा पश्चिम उपनगरांना फटका बसला होता़ त्यामुळे पावसाळ्यात या विभागांना दिलासा देण्यासाठी नाल्यांचे रुंदीकरण आवश्यक ठरले आहे़ मालवणी नाला वाढविणे, त्याची साफसफाई आणि सुधारणा, रॉयल पाल नाला बिंबिसार नगर नाल्यापासून वालभाट नदीपर्यंत वळविणे व संरक्षण भिंत बांधणे आणि चंदावरकर नाल्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)