मंदिरांच्या जतन, संवर्धनासाठी १०१ कोटींची तरतूद; एमएसआरडीसीकडे जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 05:19 AM2020-12-24T05:19:51+5:302020-12-24T07:03:59+5:30

temples : विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संबंधीची घोषणा केली होती.

Provision of Rs. 101 crore for preservation and conservation of temples; Responsibility to MSRDC | मंदिरांच्या जतन, संवर्धनासाठी १०१ कोटींची तरतूद; एमएसआरडीसीकडे जबाबदारी

मंदिरांच्या जतन, संवर्धनासाठी १०१ कोटींची तरतूद; एमएसआरडीसीकडे जबाबदारी

Next

मुंबई : राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत घेण्यात आला. हे काम 
राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत केले जाईल आणि पुढील 
आर्थिक वर्षात त्यासाठी १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संबंधीची घोषणा केली होती. या प्रकल्पाचे स्वरूप काय असावे, प्राधान्याने कोणती कामे हातात 
घ्यावी, या कामांचा तपशिल 
कसा असावा, हे ठरविण्यासाठी शासकीय समिती नेमण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे या समितीचे अध्यक्ष असतील.

शिवसेनेकडील खात्यामार्फत होणार काम
 साधारणत: इमारती, वास्तू बांधकाम हा विषय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतो. काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्याकडे हा विभाग आहे. मात्र, मंदिरांचे जतन आणि संवर्धनाचे काम शिवसेनेकडे असलेल्या सार्वजनिक उपक्रम विभागांतर्गतच्या राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) करण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन
 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस राज्यातील सर्व शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. तसेच या दिवशी त्यांच्या जीवनावर आधारित शाळांमध्ये भाषणे, निबंध, वक्तृत्व, परिसंवादाचे आयोजन करण्यात येईल.

Web Title: Provision of Rs. 101 crore for preservation and conservation of temples; Responsibility to MSRDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.