मुंबई : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. मध्य रेल्वेसाठी एकूण प्रस्तावित रु. ७,७१५ कोटी तर योजनेचा निव्वळ आराखडा २०२१-२२ रु. ४८३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मध्य रेल्वेवर विविध विकासकामे करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आल्याने रखडलेले वाहतूक सुविधांचे प्रकल्प मार्गी लागणार आहेत. या योजनेचा निव्वळ आराखडा तयार असून आता या कामांना गती मिळणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले. आरओबी आरयूबी - मुख्य आराखडा विक्रोळी - लेव्हल क्रॉसिंग क्र. १४-सी च्या जागी रोड ओव्हर ब्रिज -१० कोटी कल्याण - लेव्हल क्रॉसिंग क्र. ४७ / बी च्या जागी रोड ओव्हर ब्रिज - ३ कोटी. दिवा - रेल्वे क्रॉसिंग क्र. २९ सी च्या जागी रोड ओव्हर ब्रिज - १० कोटी. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट-जसई - लेव्हल क्रॉसिंग क्र.२ च्या ऐवजी रोड ओव्हर ब्रिज-३ कोटी. दिवा-पनवेल - लेव्हल क्रॉसिंग क्र. ६ च्या जागी रोड ओव्हर ब्रिज - ३ कोटी. दिवा-वसई - लेव्हल क्रॉसिंग क्र. ४ च्या जागी रोड ओव्हर ब्रिज - ३ कोटी. दिवा-वसई - लेव्हल क्रॉसिंग क्र. ८ च्या जागी रोड ओव्हर ब्रिज - ३ कोटी. जसई-जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट - लेव्हल क्रॉसिंग क्र.३ च्या जागी रोड ओव्हर ब्रिज- ३ कोटी. दिवा-वसई - लेव्हल क्रॉसिंग क्र. ६ च्या जागी रोड ओव्हर ब्रिज- ३ कोटी. विद्युत - मुख्य आराखडामध्य रेल्वे - प्लॅटफॉर्मवर एस्केलेटरची तरतूद (११५)- ५०.१६ कोटी.वाहतूक सुविधा लोकमान्य टिळक टर्मिनस - कोचिंग सुविधा वाढविणे - १० कोटी पनवेल - कळंबोली कोचिंग टर्मिनस (फेज -१) (चरण-१) १० कोटी. हडपसर - सॅटेलाइट (दुय्यम) टर्मिनल म्हणून विकास - ८.३६ कोटी.महानगर परिवहन प्रकल्पबेलापूर-सीवूड-उरण - विद्युतीकृत दुहेरी मार्ग - रु. २० कोटी. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (फेज - २)- २०० कोटी. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (फेज - ३)- रु. ३०० कोटी. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (फेज-३ ए) -१५० कोटी.
मध्य रेल्वेसाठी ४८३० कोटींची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 4:06 AM