आयटी कायद्यातील तरतुदी, याचिकांवर ३१ जानेवारीला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 07:30 AM2024-01-16T07:30:45+5:302024-01-16T07:31:16+5:30
न्या. गौतम पटेल व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे २९ सप्टेंबर रोजी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला.
मुंबई : सरकारसंबंधी सोशल मीडियावरील खोट्या व बनावट बातम्यांना आळा बसावा, यासाठी आयटी कायद्यातील तरतुदींमध्ये केलेल्या सुधारणांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या सर्व याचिकांवरील निर्णय १५ जानेवारीला देण्यात येणार होता. परंतु, न्यायालयाने हा निर्णय ३१ जानेवारी रोजी देऊ, असे स्पष्ट केले.
न्या. गौतम पटेल व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे २९ सप्टेंबर रोजी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यावेळी न्यायालयाने १ डिसेंबर रोजी आपण निर्णय देण्याचा प्रयत्न करू, असे म्हटले होते. मात्र, निकाल वाचन पूर्ण न झाल्याने न्यायालयाने १ डिसेंबर रोजी आपण हा निर्णय १५ जानेवारी रोजी देऊ, असे स्पष्ट केले. सोमवारच्या सुनावणीत न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी निर्णय देऊ, असे म्हटले.