पी.एस. रामाणी यांच्या ‘गुरुवंदने’साठी देश-विदेशातील डॉक्टरांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:13 AM2018-05-15T06:13:56+5:302018-05-15T06:13:56+5:30

ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ. पी.एस.रामाणी यांच्या ८० व्या वर्षातील पदापर्णाप्रीत्यथे त्यांच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला ‘गुरुवंदना’ हा सोहळा नुकताच परळ येथील हॉटेलमध्ये पार पडला.

P.S. Ramani's 'Guruvandane' doctors and doctors abroad | पी.एस. रामाणी यांच्या ‘गुरुवंदने’साठी देश-विदेशातील डॉक्टरांची मांदियाळी

पी.एस. रामाणी यांच्या ‘गुरुवंदने’साठी देश-विदेशातील डॉक्टरांची मांदियाळी

Next

मुंबई : ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ. पी.एस.रामाणी यांच्या ८० व्या वर्षातील पदापर्णाप्रीत्यथे त्यांच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला ‘गुरुवंदना’ हा सोहळा नुकताच परळ येथील हॉटेलमध्ये पार पडला. या वेळी जगाच्या कानाकोपऱ्यातून म्हणजेच जपान, टर्की, फिलीपाइन्स, मेक्सिको, इंग्लंड, अमेरिका आणि साऊथ कोरिया, आफ्रिका, इजिप्त, नेपाळ, इंडोनेशिया येथील विद्यार्थी, तसेच सहकाºयांनी आर्वजून उपस्थिती दर्शविली होती.
सोहळ््याच्या सुरुवातीला वरळी सी लिंक येथून ५ आणि १० किमी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. डॉ. रामाणी यांच्यासह जवळपास ४५० जणांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यानंतर ‘पाठीचा कणा आणि आधुनिक शस्त्रक्रिया’ या विषयावर मान्यवर डॉक्टरांनी वैद्यकीय शास्त्राच्या आधारे मार्गदर्शन केले. या सोहळ््यात गायक सिद्धार्थ यांनी डॉ. रामाणींच्या जीवनावर आधारित गाणे सादर केले. याप्रसंगी, गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. रामकृष्ण ढवळीकर यांच्या हस्ते डॉ. रामाणींचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामाणींच्या ‘ताठ कणा’ आत्मचरित्रावर आधारित चित्रपटाचा प्रोमो दाखविण्यात
आला. तसेच, त्यांचे ५८ वे पुस्तक ‘केसबुक’ याचेही प्रकाशन पार पडले. याप्रसंगी, उपस्थित शिष्यांनी गुरुंना वंदना म्हणून गुरुदक्षिणेप्रती डॉ. रामाणी यांचे अर्ध संगमरवरी शिल्प त्यांना भेट म्हणून दिले.

Web Title: P.S. Ramani's 'Guruvandane' doctors and doctors abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.