Join us

पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव

By संजय घावरे | Published: January 31, 2024 7:53 PM

यशवंत नाट्य मंदिरात रंगणार सांगितीक कार्यक्रम

मुंबई- पंडीत भीमसेन जोशी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीत महोत्सवात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक-गायिका एक प्रकारे पंडीतजींना सांगीतिक मानवंदना देणार आहेत. हा तीन दिवसीय महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य आहे.

पं. भीमसेन जोशी यांच्या ४ फेब्रुवारी या जन्मदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरामध्ये ३, ४ आणि ५ फेब्रुवारीला पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ३ फेब्रुवारीला संजीवनी भेलांडे, आशिष रानडे, अंकिता जोशी, रवी चारी, रागेश्री वैरागकर यांचे गायन होईल.

दुसऱ्या दिवशी रमाकांत गायकवाड, मधुवंती बोरगांवकर, उपेंद्र भट, अभिजीत पोहनकर, सानिया पाटणकर आपल्या सुमधूर गायनाने महोत्सवात रंग भरतील. तीन दिवसीय महोत्सवाची सांगता ५ फेब्रुवारीला यश कोल्हापुरे, मृणालिनी देसाई, चंदल पाथ्रीकर, नंदिनी शंकर, अर्चिता भट्टाचार्य, मंजुषा पाटील यांच्या गायनाने केली जाईल.

टॅग्स :भीमसेन जोशीमुंबई