मुंबई : काही माणसे मराठी माणसाच्या मनात राहायला येतात आणि मग तिथलीच होतात. त्यांचे जगणे-वागणे-असणे-बोलणे-गाणे हे सगळे मराठी संस्कृतीचा जणू भागच बनून गेलेले असते. त्यातले बिनीचे नाव म्हणजे पु. ल. देशपांडे.आठ नोव्हेंबरला पुलंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने एका देखण्या स्मरणसोहळ्याला प्रारंभ झाला. येत्या वर्षात पुलंच्या आठवणी थेट जगभरात उजळवण्याचा हेतू मनी धरून पुण्यात ‘ग्लोबल पुलोत्सवा’ची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. या स्मरणसोहळ्याचा एक भाग म्हणून कोणाही पु. ल. चाहत्याला पुलकीत करेल, असा एक ‘पु. ल. स्मरण-संच’ तयार करण्यात आला आहे - ‘आठवणीतले पु.ल.’पुलंच्या स्मृतीदिनी सुनीताबार्इंनी त्यांना वाहिलेली ‘काव्यांजली’ मोहन वाघ यांनी ‘लाइव्ह’ ध्वनिचित्रमुद्रित केली होती. ‘एक कवितांजली’ या नावाचा तो दुर्मीळ माहितीपट ‘आठवणीतले पु.ल’ या संचात आहे. शिवाय पु.ल. आणि सुनीताबाईंनी सादर केलेलीे आरती प्रभू-मर्ढेकरांच्या कवितांच्या अभिवाचनाची ‘आनंदयात्रा’ आणि ‘बहुरुपी पु. ल.’ ही दुर्मीळ छायाचित्रांची दिनदर्शिका या संचात आहे.
‘आठवणीतले पु. ल.’; ग्लोबल ‘पुलोत्सव’ व लोकमत ‘दीपोत्सव’ यांची संयुक्त प्रस्तुती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 2:08 AM