मासिक पाळीबाबत जनजागृती

By Admin | Published: March 29, 2017 06:08 AM2017-03-29T06:08:18+5:302017-03-29T06:08:18+5:30

भारतीय समाजामध्ये महिलांच्या मासिक पाळीवर मोकळेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण होतात

Public awareness about menstrual cycle | मासिक पाळीबाबत जनजागृती

मासिक पाळीबाबत जनजागृती

googlenewsNext

मुंबई : भारतीय समाजामध्ये महिलांच्या मासिक पाळीवर मोकळेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण होतात. समाजात याबद्दल जनजागृती करणे गरजेचे आहे. आता ‘अ पिरीयड आॅफ शेअरिंग’ आणि ‘अशय सोशल ग्रुप’ यांनी पुढाकार घेऊन ‘ऋतूकपा’बाबत जनजागृती सुरू केलेली आहे.
महिला मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात. सॅनिटरी नॅपकिनचा वापर ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’ असून त्यामध्ये केमिकल आणि प्लॅस्टिकचा वापर केला जातो. वापरून टाकलेल्या सॅनिटरी नॅपकिनची योग्यरीत्या विल्हेवाट लावली जात नाही. कचऱ्याच्या ठिकाणी किंवा डम्पिंग ग्राउंडमध्ये उघड्यावर टाकले जाते, त्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे महिलांच्या आरोग्यासंदर्भात या महत्त्वपूर्ण विषयावर दोन संस्था मुंबईतील महिलांसाठी जनजागृती करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Public awareness about menstrual cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.