बालमजुरीच्या मुक्त तेसाठी जनजागृती

By admin | Published: November 23, 2014 11:11 PM2014-11-23T23:11:17+5:302014-11-23T23:11:17+5:30

बालमजुरी या अनिष्ट प्रथेच्या उच्चाटनासाठी शासनाने अनेक उपाययोजना आखल्या असल्या तरी या प्रथेने आता एक गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे.

Public awareness for child labor free | बालमजुरीच्या मुक्त तेसाठी जनजागृती

बालमजुरीच्या मुक्त तेसाठी जनजागृती

Next

पालघर : बालमजुरी या अनिष्ट प्रथेच्या उच्चाटनासाठी शासनाने अनेक उपाययोजना आखल्या असल्या तरी या प्रथेने आता एक गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे. त्यामुळे त्याच्या उच्चाटनासाठी कायदेशीर बाबींसह जनमानसात जनजागृती निर्माण करण्यासाठी आयोजिलेल्या आठ दिवसांच्या जनजागृतीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
सहायक कामगार आयुक्त कार्यालय तारापूर, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प ठाणे व अभिनव शिक्षण संस्था पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने या जनजागृती मोहिमेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यामध्ये डहाणू तालुक्यातील बालमजुरांच्या मुक्ततेसाठी जिल्हा बालकामगार कृती दलामार्फत धाडसत्राचे आयोजन, अभिनव शिक्षण संस्था शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विविध दूरदर्शन कार्यक्रम, पालघर-बोईसर परिसरातील गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन बालकामगारांना कामावर ठेवल्यानंतर होणाऱ्या शिक्षेबाबत माहिती देण्यात आली. या वेळी बालमजुरी प्रथेविरुद्ध लघुपटही दाखविण्यात आला. या जनजागृती सप्ताहाचा समारोप पालघरच्या लायन्स क्लब सभागृहात करण्यात आला. या वेळी विशेष प्रशिक्षण केंद्र पालघर येथून प्रशिक्षण घेऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात म्हणजेच नियमित शाळेत येणाऱ्या १६ बालकामगारांचा या वेळी सत्कार उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकांत सागर, यांच्या हस्ते करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Public awareness for child labor free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.