मतदार नोंदणीसाठी पालिकेची जनजागृती

By admin | Published: June 24, 2016 03:56 AM2016-06-24T03:56:20+5:302016-06-24T03:56:20+5:30

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये अधिकाधिक तरुण-तरुणींनी मतदान करता यावे आणि यासाठी प्रथमत: मतदारांना नोंदणी करता यावी म्हणून मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे

Public awareness for voter registration | मतदार नोंदणीसाठी पालिकेची जनजागृती

मतदार नोंदणीसाठी पालिकेची जनजागृती

Next

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये अधिकाधिक तरुण-तरुणींनी मतदान करता यावे आणि यासाठी प्रथमत: मतदारांना नोंदणी करता यावी म्हणून मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. याकरिता प्रशासनाने घोषवाक्ये तयार केली असून, या माध्यमातून मतदार नोंदणी जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे.
मतदार नोंदणी जनजागृती अभियानाकरिता तयार करण्यात आलेल्या घोषवाक्यांमध्ये; आपले मत आपली ताकद, आपले एक मत बदल घडवू शकते, मतदार म्हणून नाव नोंदवा घटनादत्त मतदान अधिकार बजावा, मतदार नोंदणी करणे हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. सक्षम युवापिढी, सक्षम लोकशाही, स्मार्ट मतदार स्मार्ट मुंबई, सक्षम मतदार समर्थ भारत या घोष वाक्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

हिंदीतही घोषवाक्य...
मुंबई है हमारी शान, मतदार होना यही है आपकी पहचान
सबसे प्यारा मुंबई शहर, मतदार होना यही है लोकशाही का जागर
मतदार बनना है राष्ट्रीय कर्तव्य, चलो पुरा करे अपने कर्तव्य
चले शान मे, मतदान नोंदणी अभियानमे
एक कदम राष्ट्रीत्वका, नोंदणी करके मतदार बनने का

प्रत्येक मतात असते ताकद परिवर्तनाची, चला तर मग करुया नोंदणी मतदार होण्याची
एकेका मताने बनतो लोकशाहीचा सागर, सुरु करुया मतदान नोंदणीचा जागर
३१ आॅक्टोबरपर्यंत सुरु असलेल्या राष्ट्रीय मतदार यादी शुध्दीकरण मोहीम २०१६ चा लाभ घ्या. मतदार यादीत आपले नाव तपासून घ्या.

Web Title: Public awareness for voter registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.