मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये अधिकाधिक तरुण-तरुणींनी मतदान करता यावे आणि यासाठी प्रथमत: मतदारांना नोंदणी करता यावी म्हणून मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. याकरिता प्रशासनाने घोषवाक्ये तयार केली असून, या माध्यमातून मतदार नोंदणी जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे.मतदार नोंदणी जनजागृती अभियानाकरिता तयार करण्यात आलेल्या घोषवाक्यांमध्ये; आपले मत आपली ताकद, आपले एक मत बदल घडवू शकते, मतदार म्हणून नाव नोंदवा घटनादत्त मतदान अधिकार बजावा, मतदार नोंदणी करणे हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. सक्षम युवापिढी, सक्षम लोकशाही, स्मार्ट मतदार स्मार्ट मुंबई, सक्षम मतदार समर्थ भारत या घोष वाक्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)हिंदीतही घोषवाक्य...मुंबई है हमारी शान, मतदार होना यही है आपकी पहचानसबसे प्यारा मुंबई शहर, मतदार होना यही है लोकशाही का जागरमतदार बनना है राष्ट्रीय कर्तव्य, चलो पुरा करे अपने कर्तव्यचले शान मे, मतदान नोंदणी अभियानमेएक कदम राष्ट्रीत्वका, नोंदणी करके मतदार बनने काप्रत्येक मतात असते ताकद परिवर्तनाची, चला तर मग करुया नोंदणी मतदार होण्याचीएकेका मताने बनतो लोकशाहीचा सागर, सुरु करुया मतदान नोंदणीचा जागर३१ आॅक्टोबरपर्यंत सुरु असलेल्या राष्ट्रीय मतदार यादी शुध्दीकरण मोहीम २०१६ चा लाभ घ्या. मतदार यादीत आपले नाव तपासून घ्या.
मतदार नोंदणीसाठी पालिकेची जनजागृती
By admin | Published: June 24, 2016 3:56 AM