सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:09 AM2021-09-15T04:09:43+5:302021-09-15T04:09:43+5:30
मुंबई : सध्या गणपती उत्साववर कोरोना विघ्न आहे. मात्र अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करत आहेत. गणेशोत्सवामध्ये ...
मुंबई : सध्या गणपती उत्साववर कोरोना विघ्न आहे. मात्र अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करत आहेत. गणेशोत्सवामध्ये पहिल्यासारखा उत्साह दिसून येत नाही आहे. मात्र परंपरा जपण्यासाठी साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
मंडळे कसा करतात गणेशोत्सव साजरा
१) दादरचा राजा
सध्या दादरच्या राजा गणपतीच ८३ वे वर्ष आहे. सध्या गणेशोत्सवावर कोरोनचक विघ्न आहे. सरकारच्या नियमानुसार यावर्षीदेखील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील गणपतीची शाडूची मूर्ती असते. कोरोनामुळे यावर्षी वर्गणी घेण्याचेदेखील टाळले आहे. जे स्वखुशीने वर्गणी देतात ती वर्गणी घेतली जाते. पाहिल्याप्रमाणे जास्त भाविक दर्शनासाठी येत नाहीत. सगळीकडे शुकशुकाट आहे. शशिकांत सावंत म्हणाले की सध्या शासनाच्या नियमानुसार आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत. कोरोनाचे विघ्न तर गणेशोत्सवावर आहे मात्र आपली परंपरा तर जपली गेली पाहिजे.
२) राम मारुती रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
राम मारुती रोड सार्वजनिक गणेशोत्सवाचे यावर्षी ७६ वे वर्ष आहे. दरवर्षी दादरच्या पहिल्या मानाच्या गणपतीचं स्वागत मोठ्या थाटामाटात केलं जातं मात्र हे दोन वर्षे मात्र कोरोनाचे संकट गणेशोत्सवावर आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे शुकशुकाट आहे. कोरोनापूर्वी गणेशोत्सव थाटामाटात साजरा होत होता. अनेक देखावे, चलचित्रे, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होत असत मात्र यावर्षी उत्सव मात्र शासनाच्या नियमानुसार साजरा होत आहे.
३) टायकलवाडी गणेशोत्सव मंडळ
टायकलवाडी गणेशोत्सवमंडळाचे यावर्षी ३८ वे वर्ष आहे. कोरोनाच्या आधी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत असे मात्र दोन वर्षापासून कोरोनाचे संकट कायम असल्याने यावर्षीदेखील उत्सव साधेपणाने केला जात आहे. दरवर्षी बाप्पाच्या दर्शनासाठी वेगवेगळे देखावे, चलचित्रे असतात. लोकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम भरवले जातात मात्र यावर्षी सगळीकडे सामसूम आहे. दरवर्षी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत मात्र सध्या भाविकांची गर्दी दिसत नाही. सगळीकडे शुकशुकाट आहे. कार्यकर्ते चेतन गावठे म्हणाले की, सध्या अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा होणार आहे. तसेच शासनाचे नियम पाळून सर्व प्रकारचे उत्सव साजरा केले जातील.
४) श्री गणसिद्धी विनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
मंडळातर्फे गेली अनेक वर्षांपासून गणेशोत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव शासनाच्या नियमानुसार साजरा होत आहे. दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत विविध प्रकारचे देखावे दाखवले जातात मात्र यावर्षी अगदीच सध्या प्रकारे गणेशोत्सव साजरा होत आहे. मंडळाचे कार्यकर्ते गौरव सावंत म्हणाले की, सध्या शासनाच्या नियमानुसार गणेशोत्सव साजरा करत आहोत. पहिल्यांदा विविध कार्यक्रम देखावे केले जात मात्र मागच्या वर्षी तसेच यावर्षी कोरोनाचे संकट असल्या कारणामुळे यंदाचा गणेशोत्सव अगदी साध्याप्रकारे साजरा होत आहे.
५) राववाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
सध्या गणेशोत्सवावर कोरोनाचे विघ्न असल्या कारणामुळे गणेशोत्सव सर्व नियम पाळून साजरा होत आहे. पूर्वी दर्शनासाठी भाविकांची रांग लागत असे मात्र सध्या सगळीकडे सामसूम आहे. पहिल्यांदा अनेक उत्सव साजरे केले जात मात्र यावर्षी अगदीच साधेपणाने गणेशोत्सव साजरा होत आहे.