Join us

सार्वजनिक व्यायामशाळा माहिती अधिकारात

By admin | Published: December 05, 2014 12:10 AM

सार्वजनिक व्यायामशाळा, अलिबाग या संस्थेविरुध्द येथील नागरिक दिलीप जोग यांनी माहितीच्या अधिकारात केलेले अपील अंशत: मंजूर करण्यात आले आहे.

अलिबाग : सार्वजनिक व्यायामशाळा, अलिबाग या संस्थेविरुध्द येथील नागरिक दिलीप जोग यांनी माहितीच्या अधिकारात केलेले अपील अंशत: मंजूर करण्यात आले आहे. जोग यांनी मागितलेली माहिती व्यायामशाळेने पंधरा दिवसांत विनामूल्य द्यावी, असे आदेश कोकण खंडपीठाच्या माहिती आयुक्त थँक्सी फ्रान्सिस थेकेकरा यांनी दिले.जोग यांनी माहितीच्या अधिकारात २४ जुलै २०१३ला सार्वजनिक व्यायामशाळेकडे प्रथम माहिती मागितली होती. त्यावर माहिती हवी असल्यास सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयातून घ्यावी, असे व्यायामशाळेच्यावतीने २७ सप्टेंबरला सांगण्यात आले होते. तसेच संस्थेला नाहक त्रास देत आहात असा आरोप विश्र्वस्तांमार्फत करण्यात आला होता. त्यानंतर जोग यांनी कोकण खंडपीठात दुसरे अपील दाखल केले. दरम्यान, जोग यांना आता माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीत सार्वजनिक व्यायामशाळा या संस्थेने १९९७ पासून वार्षिक सर्वसाधारण सभा घेतलेलीच नसल्याचे उघड झाल्याचे जोग यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.