लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्याबाबत धोरण आखून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्र सरकारसह राज्य सरकार व मुंबई महापालिकेला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर २७ एप्रिलला सुनावणी ठेवली आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सर्व नागरिकांना बूस्टर डोस देण्यासाठी यंत्रणा उभी करण्यासाठी व्यवसायाने वकील असलेल्या धृती कपाडिया यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्रभारी मुख्य न्या. संजय गंगापूरवाला व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे ही याचिका नमूद करण्यात आली.