अंधेरीतील कामगार हॉस्पिटल सुरु करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका 

By मनोहर कुंभेजकर | Published: April 20, 2023 03:47 PM2023-04-20T15:47:29+5:302023-04-20T15:47:45+5:30

केंद्र सरकारने आश्वासन देऊनही अंधेरीतील कामगार हॉस्पिटल अद्याप बंदच.

Public Interest Litigation in High Court to start kamgar Hospital in Andheri | अंधेरीतील कामगार हॉस्पिटल सुरु करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका 

अंधेरीतील कामगार हॉस्पिटल सुरु करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका 

googlenewsNext

मुंबई-अंधेरी येथील अद्ययावत कामगार हॉस्पिटल मागील चार वर्षांपासून बंद असल्याने ते सुरु करावे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात आले. यासंदर्भात केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने एक बैठकही घेतली होती, तरिही अद्याप काहीच हालचाल झाल्याचे दिसत नाही. लाखो कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी लोकमतला दिली.

यासंदर्भात माहिती देताना राजेश शर्मा म्हणाले की, अंधेरीतील कामगार हॉस्पिटल प्रश्नी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निर्देशानुसार केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या सचिव आरती आहुजा यांनी मुंबईत एक बैठकही घेतली होती. या बैठकीत इएसआयसीचे डायरेक्टर जनरल डॉ. राजेंद्र कुमार, राज्य सरकार व केंद्र सरकारचे उच्च अधिकारी, मी व उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष क्लाईव्ह डायस उपस्थित होतो. काही तांत्रिक अडचणीमुळे हॉस्पिटल सुरु होण्यास विलंब होत आहे, परंतू पुढील तीन महिन्यात ओपीडी विभाग सुरु करु असे आश्वासन देण्यात आले होते. या बैठकीला तीन महिने होऊन गेले परंतु अद्याप कोणतीही आरोग्य सेवा सुरु करण्यात आलेली नाही.

लाखो कामगारांना उपचारासाठी दुसऱ्या हॉस्पिटलची सेवा घ्यावी लागते. आश्वासन देऊनही हॉस्पिटल सुरु होत नसल्याने कामगारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सरकार काहीच करत नसल्याने हे हॉस्पिटल लवकर सुरु व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने लाखो कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन न्याय द्यावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली.  

अंधेरी येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या या हॉस्पिटलमध्ये ५०० बेडस व मेडीकल कॉलेज होते. या रुग्णालयात ओपीडी, आयपीडी (३५० बेड्स), आयसीयू आणि सुपर स्पेशालिटी सुविधा २४ तास सुरु होत्या. पॅथॉलॉजी, रेडिओल़ॉजी, एक्स-रे, सीटी-एमआरआय, ऑपरेशन थिएटसह सर्व सोयी सुविधांनी हे रुग्णालय सुसज्ज होते. ओपीडी विभागात दररोज १८०० ते २००० रुग्ण भेट देत होते, ब्ल़ड बँकेची सुविधाही उपलब्ध होती. महाराष्ट्रातील अनेक शहरातील कामगार अंधेरीच्या हॉस्पिटमध्ये उपचारासाठी येत होते. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात होत्या. परंतु १७ फेब्रुवारी २०१८ रोजी या रुग्णालयात आगीची दुर्घटना घडून १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला व १५० जण जखमी झाले. तेंव्हापासून हे रुग्णालय बंद आहे, अशी माहिती राजेश शर्मा यांनी दिली.

Web Title: Public Interest Litigation in High Court to start kamgar Hospital in Andheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई