मुंबई : भारतीय अणु संशोधनाचे जनक डॉ़ होमी जहांगीर भाभा यांचा मलबार हिल येथील बंगल्याचा लिलाव न करता ही वास्तू हेरिटेज म्हणून घोषित करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे़अणुऊर्जा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मोतीराम वरळीकर व इतरांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे़ न्यायालय यावर काय आदेश देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़ यावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे़ (प्रतिनिधी)
भाभांचा बंगला वाचवण्यासाठी जनहित याचिका
By admin | Published: June 15, 2014 1:44 AM