राज्यातील अधिकाऱ्यांची उत्तराखंडात जनजागृती

By admin | Published: June 26, 2017 01:56 AM2017-06-26T01:56:05+5:302017-06-26T01:56:05+5:30

राज्यातील मुंबई शहरी भागातून वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश देवरे आणि नाशिक ग्रामीण भागातून वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर यांना

Public officials in Uttarakhand | राज्यातील अधिकाऱ्यांची उत्तराखंडात जनजागृती

राज्यातील अधिकाऱ्यांची उत्तराखंडात जनजागृती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील मुंबई शहरी भागातून वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश देवरे आणि नाशिक ग्रामीण भागातून वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर यांना, उत्तराखंड वनविभागाने प्रशिक्षण देण्यासाठी बोलाविले होते. हे प्रशिक्षण वनअधिकारी आणि नागरिकांना देण्यासाठी देण्यात आले. १९ जून ते २३ जून या कालावधीत प्रशिक्षण शिबिर उत्तराखंडातील पौंडी आणि तेरी या दोन वन विभागात राबविण्यात आले.
मुंबईची रेस्क्यू टीम बिबट्यांना पकडणे आणि पकडल्यावर बिबट्याची व्यवस्थित सुटका करणे, या दोन गोष्टींमध्ये निपुण आहे. मुंबईच्या नॅशनल पार्कमध्ये बिबट्याच्या संरक्षणासाठी जनजागृती केली जाते. त्याचप्रमाणे, उत्तराखंडातील जनतेलादेखील अशाच प्रकारचे प्रशिक्षण दिले गेले. उत्तराखंड सरकारकडे १७ वर्षांचे रेकार्ड आहे. या वर्षांत बऱ्याच वेळा बिबट्याने हल्ले केल्याचे निदर्शनास आलेले आहे. वर्षभरामध्ये ५ ते ६ हल्ले बिबट्यांचे मनुष्यवस्तीवर होत असतात, असे तेथील रहिवाशांचे सांगणे आहे. या आधी नोव्हेंबर महिन्यात उत्तराखंड वनविभागातील अधिकारी वर्गाने मुंबईच्या नॅशनल पार्कमध्ये भेट दिली होती. त्या वेळी त्यांना सर्व प्रकारची माहिती पुरविली गेली.

Web Title: Public officials in Uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.