‘लोकशक्ती’चा विरार, सफाळे थांबा रद्द

By admin | Published: November 13, 2016 03:07 AM2016-11-13T03:07:21+5:302016-11-13T03:07:21+5:30

पालघर, डहाणू तील रेल्वे प्रवाशांना सोयीेसुविधा देण्याबाबत नेहमीच हात आखडते घेणाऱ्या पश्चिम रेल्वे ने लोकशक्ती एक्स्प्रेसचे सफाळे, विरार येथे असणारे थांबे रद्द केल्याने

'Public power' of Virar, stop flowing cancellation | ‘लोकशक्ती’चा विरार, सफाळे थांबा रद्द

‘लोकशक्ती’चा विरार, सफाळे थांबा रद्द

Next

पालघर : पालघर, डहाणू तील रेल्वे प्रवाशांना सोयीेसुविधा देण्याबाबत नेहमीच हात आखडते घेणाऱ्या पश्चिम रेल्वे ने लोकशक्ती एक्स्प्रेसचे सफाळे, विरार येथे असणारे थांबे रद्द केल्याने प्रवाशामधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून पालघर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाने तीव्र आंदोलना चा इशारा दिला आहे.
पश्चिम रेल्वेचे सफाळे हे एक महत्वाचे स्टेशन असून बागायती, मत्स्यव्यवसाय आणि दुग्ध व्यवसायाने हा परिसर समृध्द आहे इथल्या भाजीपाल्याला आणि दुधाला मुंबईतून मोठी मागणी आहे. त्यामुळे सफाळे लगतच्या माकूणसार, कोरे, दातीवरे, एडवन, मथाने, ई. ३० ते ४० गावा मधून त्याचा मुंबईत मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो. डहाणू पर्यंतचा भागाला उपनगरीय दर्जा प्राप्त झाल्या नंतर नागरिकीकरणाला वेग येत असून ह्या भागातून दररोज हजारो लोक रोजगार, नोकरी, शिक्षणासाठी मुंबईला जात असतात त्यांना एक्स्प्रेस, शटल, लोकल गाड्याच्या थांब्यांची उणीव भासू लागली. पूर्वी शटल, मेमू आणि वीरमगाव पॅसेंजर (दुधवाली गाडी) या ठराविक गाड्यांचा थांब्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही गाड्या नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते सफाळे येथील प्रवाशांनी १५ ते १८ वर्षा पूर्वी केलेल्या आंदोलना नंतर लोकशक्ती एक्स्प्रेस ला सफाळे स्टेशन ला रेल्वे प्रशासनाने थांबा दिला. त्यामुळे माझगाव डॉक, अन्य कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी, भाजीपाला, दूध, मासे व्यावसायिक ई. सुमारे तीनशे ते चारशे सफाळेकरांचा प्रवास काही अंशी सुखकर झाला होता. असे असतांना आता पश्चिम रेल्वेचे मंडल रेल्वे प्रबंधक मुकुल जैन यांनी ग्रँट रोड पासून ते थेट पालघर, वलसाड, सुरत ई. स्टेशन वरील अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात लोकशक्ती एक्स्प्रेस ला विरार, सफाळे स्टेशन वरील थांबे रद्द करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या निर्णयाच्या कार्यवाही ला कधीपासून सुरु वात होणार आहे या बाबत कुठलाही उल्लेख नसला तरी कधीही याची अंमलबजावणी होण्याची शक्यता असल्याने प्रवाश्यामधून संताप व्यक्त होत आहे. चर्चगेट, दादर येथून संध्याकाळनंतर पालघर, डहाणूसाठी थेट लोकल सेवेत वाढ करण्याऐवजी रेल्वे प्रशासनाने सौराष्ट्र मेलला सुपर फास्टचा दर्जा देऊन तीची वेळ एक तास उशिराची केली. त्याची भरपाई म्हणून ८.३७ ला चर्चगेट ते डहाणू लोकल सुरु केली. मात्र यात विरार आणि पालघर - डहाणू प्रवाशांमध्ये नेहमीची बाचाबाची सुरु झाली. (प्रतिनिधी)

अंधेरी - डहाणू लोकलसाठी नवी मागणी
पश्चिम रेल्वे कडून पालघर, डहाणू भागातील प्रवाशांना नेहमीच सापत्न वागणूक देण्यात येत असून लोकशक्ती चा थांबा रद्द करावयाचा निर्णय अमलात आणायचाच असेल तर त्या वेळेत नवीन अंधेरी ते डहाणू लोकल सुरु करून तीला बोरिवली ते वैतरणा दरम्यान थांबा देऊ नये अशी मागणी पालघर जिल्हा रेल्वे प्रवाशी संघाचे सेक्रेटरी नंदू पावगी यांनी केली आहे.

डहाणूपर्यंत उपनगरीय दर्जा प्राप्त झाल्यानंतर नागरिकीकरणाला
वेग येत असून ह्या भागातून दररोज हजारो लोक रोजगार, नोकरी, शिक्षणासाठी मुंबईला जात असतात त्यांना एक्स्प्रेस, शटल, लोकल गाड्याच्या थांब्यांची उणीव भासू लागली. पूर्वी शटल, मेमू आणि वीरमगाव पॅसेंजर यांद्वारे मुंबईत मोठ्या प्रमाणात पुरवठा व्हायचा. मात्र, सध्या सोयीस्कर पडत असलेल्या लोकशक्ती एक्सप्रेसचा थांबा रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Web Title: 'Public power' of Virar, stop flowing cancellation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.