सार्वजनिक शौचालय आता मोफत, ‘पे अँड युज’च्या नावाखाली सुरू होती लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 05:02 AM2018-02-04T05:02:48+5:302018-02-04T05:02:55+5:30

‘पे अँड युज’च्या नावाखाली मुंबईकरांची लूट करणाºया खासगी संस्थांचे दुकान आता बंद होणार आहे. मुंबईतील स्वच्छतागृहांची सुविधा यापुढे मोफत उपलब्ध करण्याची घोषणा आयुक्तांनी अर्थसंकल्पातून केली आहे. जाहिरातीच्या माध्यमातून या स्वच्छतागृहांच्या देखभालीचा खर्च वसूल केला जाणार आहे.

Public toilets are now free, under the name of 'Pay and Use', looting started | सार्वजनिक शौचालय आता मोफत, ‘पे अँड युज’च्या नावाखाली सुरू होती लूट

सार्वजनिक शौचालय आता मोफत, ‘पे अँड युज’च्या नावाखाली सुरू होती लूट

googlenewsNext

मुंबई : ‘पे अँड युज’च्या नावाखाली मुंबईकरांची लूट करणाºया खासगी संस्थांचे दुकान आता बंद होणार आहे. मुंबईतील स्वच्छतागृहांची सुविधा यापुढे मोफत उपलब्ध करण्याची घोषणा आयुक्तांनी अर्थसंकल्पातून केली आहे. जाहिरातीच्या माध्यमातून या स्वच्छतागृहांच्या देखभालीचा खर्च वसूल केला जाणार आहे.
‘पैसे द्या आणि वापरा’ या तत्त्वावर मुंबईत स्वच्छतागृह सुरू आहेत. या स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, या स्वच्छतागृहाच्या वापरासाठी लोकांकडून २ ते ५ रुपये वसूल करणाºया खासगी संस्था, या स्वच्छतागृहांची स्वच्छता ठेवत नाहीत. याबाबत तक्रारी येत असल्याने, महिलांना ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती. अखेर याचा गांभीर्याने विचार करीत, पालिकेने यापुढे शौचालयांची
सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वच्छतागृहांवर जाहिरात लावून देखभालीचा खर्च पालिका मिळवणार आहे. नव्या शौचालयांच्या बांधकामासाठी; तसेच सध्याच्या स्वच्छतागृहांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पालिकेने १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

२० हजार नवी शौचकूपे
सार्वजनिक स्वच्छतागृहांची गरज ओळखून
पालिकेने येत्या काळात २० हजार शौचकूपांचे बांधकाम करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अपुºया जागेवर उपाय म्हणून ही दुमजली शौचालये बांधण्यात येणार आहेत.

शौचालयांच्या डिझाईनसाठी पॅनेल
महापालिका उभारणाºया शौचालयांमुळे मुंबईकरांना चांगली सुविधा मिळावी यासाठी परिमंडळनिहाय वास्तुविशारदांचे पॅनेल तयार करण्यात येणार आहे. तसेच या पॅनेल्सद्वारे तयार करण्यात येणारे शौचालयाचे डिझाईन हे जागेनुरूप व परिसरानुरूप असेल, याचीही काळजी घेण्यास आयुक्तांनी अधिकाºयांना बजावले आहे.

शौचालय
घेणार ताब्यात
मुंबईतील अशा पे अँड युज शौचालयांची पाहणी करण्याचे आदेश सर्व सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत. या पाहणीत त्या शौचालयात अस्वच्छता दिसून आल्यास, निश्चित दरापेक्षा अधिक शुल्क आकारले जात असेल किंवा शौचालयाचा नियमबाह्य वापर होत असल्यास अशा शौचालयांना नोटीस देऊन ती ताब्यात घेण्यात येणार आहेत.

Web Title: Public toilets are now free, under the name of 'Pay and Use', looting started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई