सार्वजनिक विहिरी तातडीने होणार स्वच्छ!

By admin | Published: July 4, 2014 03:46 AM2014-07-04T03:46:45+5:302014-07-04T03:46:45+5:30

पालिका क्षेत्रातील अस्वच्छ सार्वजनिक विहिरींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे वृत्त गुरुवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच काँग्रेसचे नगरसेवक फरीद कुरेशी यांनी प्रशासनाला याबाबत कार्यवाहीचे पत्र दिले

Public wells will be promptly clean! | सार्वजनिक विहिरी तातडीने होणार स्वच्छ!

सार्वजनिक विहिरी तातडीने होणार स्वच्छ!

Next

राजू काळे, भार्इंदर
पाणीटंचाईमध्ये पर्यायी आधार ठरणाऱ्या पालिका क्षेत्रातील अस्वच्छ सार्वजनिक विहिरींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे वृत्त गुरुवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच काँग्रेसचे नगरसेवक फरीद कुरेशी यांनी प्रशासनाला याबाबत कार्यवाहीचे पत्र दिले. यावर आयुक्त सुरेश काकाणी यांनीही या विहिरी स्वच्छ करण्यासाठी मोहीम हाती घेतल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली.
महापालिकेकडून स्वत:च्या अखत्यारीतील विहिरींच्या देखभाल व दुरुस्तीसाठी प्रत्येक अंदाजपत्रकात लाखोंची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, प्रशासनासह राजकीय इच्छाशक्तीअभावी या विहिरींच्या स्वच्छतेसह त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यासाठी केलेली तरतूद केवळ शोभेचे आकडेच ठरली आहे. यामुळे दुर्लक्षित झालेल्या विहिरी अस्वच्छतेने माखलेल्या असतानाही त्या स्वच्छ करण्याऐवजी त्या बंदिस्त करून ठेवल्या आहेत. शहराला आधीच शासकीय कोट्यातील अपुऱ्या पाणीपुरवठ्यातून तहान भागवावी लागत आहे. या अपुऱ्या पाणीपुरवठ्यावर मात करण्यासाठी महापालिकेच्या विहिरी पर्यायी आधार ठरत असतानाही त्याबाबत प्रशासनाने अद्याप गांभीर्य दाखवलेले नाही. यंदा पावसाने मोठ्या विलंबाने मंगळवारी शहरात हजेरी लावून सुखद धक्का दिला. असे असले तरी शहरातील पाणीपुरवठा धरणातील उपलब्ध साठ्यावर येत्या आठवड्यात ठरणार आहे. तरीही प्रशासनाला उपलब्ध पर्यायाचा अद्याप विसर पडल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्याचे गांभीर्य ओळखून काँग्रेसचे कुरेशी यांनी आयुक्त काकाणी यांना पत्र लिहून सार्वजनिक विहिरी त्वरित दुरुस्त व स्वच्छ करण्याची मागणी केली आहे. शिवाय, या विहिरींतील पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी मागणीनुसार उपलब्ध करून देण्याची मागणीही केली. तसेच आयुक्तांनीसुद्धा या वृत्ताची दखल घेऊन पालिका अखत्यारीतील सर्व विहिरी त्वरित स्वच्छ करून त्यातील पाण्याचा पर्यायी वापरासाठी उपयोग करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Public wells will be promptly clean!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.