पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनताच पर्याय देईल- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 06:14 PM2018-08-27T18:14:14+5:302018-08-27T18:14:25+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनताच पर्याय देईल, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत.

The public will give options to Prime Minister Narendra Modi by sharad pawar | पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनताच पर्याय देईल- शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनताच पर्याय देईल- शरद पवार

Next

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनताच पर्याय देईल, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

एखाद्या संघटनेत काम करत असताना काही जण पडद्याच्या मागे राहून काम करतात, पडद्याच्या मागे राहून काम करणाऱ्यांचे योगदान मोठे असते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून ज्यांनी पडद्यामागून योगदान दिले त्यात संजय खोडके यांचं नाव घेता येईल, असंही पवार म्हणाले आहेत. शरद पवार यांनी संजय खोडके यांचे पक्षात स्वागत करत भविष्यात अमरावतीत पक्ष वाढीसाठी खोडके यांचा नक्कीच उपयोग होईल, अशी भावना व्यक्त केली.

2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जनताच भाजपाला पर्याय देईल. त्यामुळे निवडणुकीची आम्हाला चिंता नाही. काँग्रेस पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असणार नाही. ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार असतील त्याच पक्षाचा पंतप्रधान होईल, असंही पवार म्हणाले आहेत. राजकारणात होणा-या बदलाला तयार असणा-या पक्षाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल, असं मत पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. या आधी राहुल गांधी यांनी काँग्रेसला जागा मिळाल्या तर मीच पंतप्रधान होणार असं वक्तव्य केलं होतं. परंतु राहुल गांधींनीच मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचंही पुढे केलं आहे.

 

Web Title: The public will give options to Prime Minister Narendra Modi by sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.