बालकुमार कथा व कविता कोशाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2015 02:07 AM2015-12-19T02:07:26+5:302015-12-19T02:07:26+5:30
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बालकुमार कथा कोश खंड ३ आणि बाल कविता कोशाच्या दुसऱ्या खंडाचे प्रकाशन करण्यात आले.
मुंबई : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बालकुमार कथा कोश खंड ३ आणि बाल कविता कोशाच्या दुसऱ्या खंडाचे प्रकाशन करण्यात आले.
निशिगंधा वाड एज्युकेशन अॅण्ड कल्चरल फाउंडेशन आणि विद्यावैभव प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बाल खंड डिजिटल रूपात आणण्यासाठी सरकारी योजनेतून २५ लाख रुपयांचा निधीची घोषणाही गडकरी यांनी केली. साहित्य कलाकृतींबद्दलची सजगता आणि जाणीव महाराष्ट्र आणि बंगालमध्ये असल्याने सर्वाधिक साहित्यिक याच दोन राज्यांतून निर्माण झाले. सध्या अवतीभवती सुशिक्षित माणसे खूप दिसतात; मात्र ती सुसंस्कृत असतीलच याबद्दल खात्री देता येत नाही. माणूस लांबून मोठा वाटत असला तरी जवळ गेल्यानंतर तो खुजा असल्याचे अनुभव अनेकांच्या वाट्याला येतात, असे गडकरी या वेळी म्हणाले. (प्रतिनिधी)