‘चॅलेंजेस इन दी टाइम ऑफ लॉकडाऊन’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 01:33 AM2020-08-09T01:33:07+5:302020-08-09T01:33:14+5:30

लेखिका म्हणून गौरी छाब्रियांचे हे पहिले पुस्तक आहे. ३ ऑगस्ट रोजी या पुस्तकाचे प्रकाशन झूम अ‍ॅपद्वारे करण्यात आले.

Publication of the book 'Challenges in the Time of Lockdown' | ‘चॅलेंजेस इन दी टाइम ऑफ लॉकडाऊन’ पुस्तकाचे प्रकाशन

‘चॅलेंजेस इन दी टाइम ऑफ लॉकडाऊन’ पुस्तकाचे प्रकाशन

googlenewsNext

मुंबई : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. सामाजिक, आर्थिक, भावनिक पातळीवर या लॉकडाऊनचे वेगवेगळे पडसाद उमटले. या लॉकडाऊनमुळे समाजापुढे निर्माण झालेल्या आव्हानांबाबत व त्यातून नव्याने शिकायला मिळालेल्या गोष्टींबाबत समाजातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींशी चर्चा करून, त्यावर व्यवसायाने वकील असलेल्या व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या अ‍ॅड. गौरी छाब्रिया यांनी ‘चॅलेंजस इन दी टाइम आॅफ लॉकडाऊन’ हे पुस्तक लिहिले आहे.

लेखिका म्हणून हे त्यांचे पहिले पुस्तक आहे. ३ आॅगस्ट रोजी या पुस्तकाचे प्रकाशन झूम अ‍ॅपद्वारे करण्यात आले. हा पुस्तक प्रकाशन सोहळा डिजिटल मार्केटिंग एजन्सी आॅल स्टार डिजिटलतर्फे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून खासदार (राज्यसभा) कुमार केतकर, अ‍ॅड. असिफ शौकर कुरेशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. तर हिंदुजा समूहाचे (फ्रान्स) अध्यक्ष प्रकाश हिंदुजा हे या कार्यक्रमाचे आदरणीय अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कॅबिनेट मंत्री अ‍ॅड. सुनील केदार, माजी खासदार आणि लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी अ‍ॅड. गौरी छाब्रिया यांना पुस्तक प्रकाशनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारने देशभर लॉकडाऊन जाहीर केला. घरी राहूनच आयुष्याला दिशा देण्याचे आव्हान लोकांपुढे उभे राहिले. या अभूतपूर्व अनुभवांची दखल घेऊन अ‍ॅड. गौरी छाब्रिया यांनी समाजातील विविध क्षेत्रांतील २६ प्रतिष्ठित व्यक्तींशी संवाद साधून त्यांच्यासमोरील आव्हाने, संघर्ष आणि त्यातून घेतलेले धडे याबाबतचे त्यांचे अनुभव ‘चॅलेंजस इन दी टाइम आॅफ लॉकडाऊन’मध्ये मांडले आहेत. 

माजी खासदार आणि लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा,कॅबिनेट मंत्री अ‍ॅड. सुनील केदार यांनी अ‍ॅड. गौरी छाब्रिया यांना पुस्तक प्रकाशनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Web Title: Publication of the book 'Challenges in the Time of Lockdown'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.