‘भ्रमणगाथा एका विद्याधराची’ पुस्तकाचे प्रकाशन
By admin | Published: February 28, 2015 11:08 PM2015-02-28T23:08:05+5:302015-02-28T23:08:05+5:30
भ्रमणगाथा एका विद्याधराची, या पुस्तकाचे शुक्रवारी दु.१२.३० वा.च्या सुमारास डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात प्रकाशन झाले.
डोंबिवली : भ्रमणगाथा एका विद्याधराची, या पुस्तकाचे शुक्रवारी दु.१२.३० वा.च्या सुमारास डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात प्रकाशन झाले. या वेळी पुस्तकाचे लेखक विद्याधर भुस्कुटे, लेप्टनंट जनरल एस.एस. हसनीन, आर्य ग्लोबल ग्रुप आॅफ स्कूलचे भरत मलीक, नवचैतन्य पब्लिकेशन्सचे प्रकाशक शरद मराठे, माजी नगराध्यक्ष आबा पटवारी, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, बँक आॅफ इंडियाचे महाव्यवस्थापक तिरोलचंद सिंघ आदींसह माजी स्वातंत्र्यसैनिक रवींद्र आणि सिंधुताई भुस्कुटे, वृंदा भुस्कुटे आदी उपस्थित होते.
या पुस्तकात लेखकाने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत शांतीचा संदेश देण्यासाठी भ्रमण केले, त्या वेळी त्यांनी अनेक ठिकाणी सामाजिक कार्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्याचे अनुभव मांडले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन हसनीन यांच्या हस्ते करण्यात आले.
याच निमित्ताने भुस्कुटेंच्या आरोहन - सोच की नयी खोज, या उपक्रमाच्या संकल्पनेचीही माहिती उपस्थितांना देण्यात आली. त्यासाठी टायटल गीत हे शंकर महादेवन यांनी म्हटले असून ‘हम तुम मिल गये तो ये दुनिया बदले’ असे त्या गीताचे शब्द आहेत. (प्रतिनिधी)