रवींद्रकुमार सिंगल यांच्या सायकल शर्यतीतील अनुभवावरील पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:08 AM2021-09-21T04:08:19+5:302021-09-21T04:08:19+5:30

मुंबई - वैधमापन शास्त्र नियंत्रक डॉ. रवींद्र सिंगल यांच्या सायकल शर्यतीवरील अनुभवांचे संकलन असलेल्या पेडलिंग जर्नी : डेक्कन क्लिफ ...

Publication of a book by Ravindra Kumar Singal on his experience in cycling | रवींद्रकुमार सिंगल यांच्या सायकल शर्यतीतील अनुभवावरील पुस्तकाचे प्रकाशन

रवींद्रकुमार सिंगल यांच्या सायकल शर्यतीतील अनुभवावरील पुस्तकाचे प्रकाशन

Next

मुंबई - वैधमापन शास्त्र नियंत्रक डॉ. रवींद्र सिंगल यांच्या सायकल शर्यतीवरील अनुभवांचे संकलन असलेल्या पेडलिंग जर्नी : डेक्कन क्लिफ हँगर या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले.

डॉ. सिंगल यांनी २०१७ मध्ये पुणे ते गोवा डेक्कन क्लिफ हँगर या ६४३ किलोमीटरच्या सायकल शर्यतीमध्ये भाग घेतला होता. ही शर्यत अतिशय खडतर होती. तसेच विशिष्ट कालमर्यादेत ती पूर्ण करणे आवश्यक होते. त्यासाठी मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती सुदृढ तसेच सराव क्रमप्राप्त होते. डॉ. सिंगल यांनी या शर्यतीसाठी ६ महिने प्रशिक्षण घेतले.

त्यांनी ४ नोव्हेंबर, २०१७ रोजी प्रत्यक्षात शर्यतीत भाग घेतला. त्यांच्याबरोबर इतर काही प्रतिस्पर्धी होते, परंतु मानसिक व शारीरिक थकव्यामुळे काहींनी ही शर्यत मध्येच सोडून दिली. परंतु, डॉ. सिंगल यांनी मानसिक तयारीच्या बळावर शर्यत वयाच्या पन्नाशीतही पूर्ण केली.

या शर्यतीचा ६४३ किलोमीटरचा सायकलवरील खडतर प्रवास करताना शारीरिक व मानसिक क्षमतांचा पूर्ण कस लागला, तो प्रवास तरुणांचे मनोधैर्य व मनोबल उंचावण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरावा म्हणून डॉ. सिंगल यांनी हे पुस्तक लिहिले. डॉ. वैशाली बालाजीवाले या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. पुस्तक प्रकाशनास उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार प्रधान सचिव विनिता वेद सिंगल आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Publication of a book by Ravindra Kumar Singal on his experience in cycling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.