Join us

‘व्यक्त मी अव्यक्त मी’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:07 AM

मुंबई : नाटककार, अभिनेते सुरेश खरे यांच्या हस्ते भरारी प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात येत असलेल्या स्मिता आपटे यांच्या ‘व्यक्त ...

मुंबई : नाटककार, अभिनेते सुरेश खरे यांच्या हस्ते भरारी प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात येत असलेल्या स्मिता आपटे यांच्या ‘व्यक्त मी अव्यक्त मी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. हा कार्यक्रम शनिवार १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गोरेगाव येथील फिल्मिस्तानजवळील इव्हेंट बँक्वेट येथे होणार आहे. यावेळी कवी-लेखक प्रसाद कुलकर्णी, भरारी प्रकाशनच्या संचालिका लता गुठे आदींच्या उपस्थितीत हे प्रकाशन होईल.

माणिक वर्मा यांची ध्वनिमुद्रित मैफल

मुंबई : किराणा आणि आग्रा घराण्याच्या ख्यातनाम गायिका माणिक वर्मा यांच्या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाची मैफल दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार, १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. त्यांना तबल्यावर नाना मुळे तसेच संवादिनीवर गोविंदराव पटवर्धन यांची साथ आहे. त्याची लिंक www.dadarmatungaculturalcentre.org या संकेतस्थळावर कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी उपलब्ध होईल. दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राने कोरोना महामारी आणि टाळेबंदी यामुळे दरमहा प्रत्यक्ष होणारे कार्यक्रम सप्टेंबर २०२० पासून ध्वनिमुद्रण पद्धतीने श्रवणानंद देण्याचा स्वरसंचित हा उपक्रम सुरू केला आहे.

....

शेतीविषयक पुरस्कार

मुंबई : कृषीक्षेत्रात उपयुक्त आणि नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती संस्थेला प्रोत्साहन म्हणून मराठी विज्ञान परिषदेतर्फे वसंतराव नाईक आणि बळीराजा-अण्णासाहेब शिंदे कृषी हे पुरस्कार दर तीन वर्षांनी दिले जातात. इच्छुकांनी १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत नाव, पत्ता, दूरध्वनी, ई-मेल, कामाची माहिती व संबंधित छायाचित्रे इ. तपशिलासह आपला अर्ज पाठवावा. संपर्क: मराठी विज्ञान परिषद, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२.

...

उत्तम विज्ञान पुस्तक

मुंबई : जानेवारी, २०१९ ते डिसेंबर, २०२० या कालावधीत प्रकाशित झालेल्या, मराठीतील विज्ञानविषयक उत्तम पुस्तकाला मराठी विज्ञान परिषदेतर्फे पारितोषिक देण्यात येईल. मात्र ते पाठ्यपुस्तक किंवा हस्तलिखित स्वरूपात नसावे. इच्छुक लेखक / प्रकाशकांनी आपल्या पुस्तकाच्या प्रत्येकी दोन प्रती १५ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत तपशिलासह पाठवाव्यात. संपर्क: मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई- ४०००२२

...