मोहना काऱखानीस यांच्या ‘एका’ कादंबरीचे प्रकाशन
By संजय घावरे | Published: June 3, 2024 05:43 PM2024-06-03T17:43:08+5:302024-06-03T17:43:28+5:30
‘एका’ या कादंबरीसह ‘जाईचा मांडव’ आणि ‘पैंजण’या कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला.
मुंबई - सिंगापूरमधील मोहना कारखानीस लिखित ‘एका’ या कादंबरीसह ‘जाईचा मांडव’ आणि ‘पैंजण’या कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा कांदिवली येथील एव्हरशाईन हॉलमध्ये नुकताच संपन्न झाला.
ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मीना नाईक, प्रा. जाई म्हात्रे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय सैतवडेकर आणि डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे उपस्थित होते. धनश्री दामले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या समारंभात प्रकाश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, लता गुठे, संजीवनी समेळ, संगीता अरबुने, कौतुक मुळे, फरझाना इकबाल आणि संजय कारखानीस आदी साहित्यिकही हजर होते.