हॉटेल व्यावसायिकांना पुजारी गँगच्या धमक्या

By admin | Published: June 18, 2017 02:01 AM2017-06-18T02:01:42+5:302017-06-18T02:01:42+5:30

अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीने गेल्या काही महिन्यांपासून नालासोपारा शहरातील हॉटेल व्यावसायिकांना फोनवरून धमकावत खंडणी मागण्याचे सत्र सुरु केले आहे.

Pujari Gang threats to hotel professionals | हॉटेल व्यावसायिकांना पुजारी गँगच्या धमक्या

हॉटेल व्यावसायिकांना पुजारी गँगच्या धमक्या

Next

शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीने गेल्या काही महिन्यांपासून नालासोपारा शहरातील हॉटेल व्यावसायिकांना फोनवरून धमकावत खंडणी मागण्याचे सत्र सुरु केले आहे. गेल्या महिन्यात खंडणीसाठी पुजारीच्या शूटरनी एका हॉटेलच्या मॅनेजरवरच गोळीबार केला होता. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीने पहिल्यांदा नालासोपारा शहरातील गॅलेक्सी हॉटेलचे मालक शशीधर शेट्टी यांना धमकावून २५ लाखाची खंडणी मागितली होती. मात्र, त्यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना वारंवार धमकावले जात होते. याप्रकरणी त्यांनी तुळींज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर मे महिन्यात त्यांच्या हॉटेलचे मॅनेजर दीपक वर्मा यांच्याकडे पुजारी टोळीतील दोन गुंड आले होते. त्यांनी ते कुठे आहेत अशी चौकशी केली असता वर्मा यांनी माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या गुंडांनी वर्मा यांच्यावर गोळीबार करून पळ काढला होता. याप्रकरणी पुजारी टोळीतील तिघांना अटकही करण्यात आली होती.
त्यानंतरही नालासोपारा शहरातील आणखी एका हॉटेल व्यावसायिकाकडे पुजारीने फोनवरून धमकावत खंडणी मागितली होती. या ही प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. ही दोन प्रकरणे ताजी असतानाच याच शहरातील एका नगरसेवकालाही पुजारीने फोनवरून धमकावून खंडणी मागितली. याप्रकरणी या नगरसेवकाने तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पुजारीकडून धमकी आल्याची आणखी एक तक्रार आजच दाखल झाली आहे. याप्रकरणी चौकशी सुुरु असून कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी दिली.

आता पुजारीने गेल्या आठ दिवसांपासून नालासोपारा शहरातील आणखी एका हॉटेल व्यावसायिकाला फोनवरून धमक्या देणे सुरु केले आहे. या हॉटेल व्यावसायिकाने तुळींज पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे.

Web Title: Pujari Gang threats to hotel professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.