पुजीत अगरवालच्या कोठडीत वाढ

By admin | Published: September 28, 2016 01:40 AM2016-09-28T01:40:57+5:302016-09-28T01:40:57+5:30

फ्लॅटमध्ये गुंतवणूक केलेल्या नऊ गुंतवणूकदारांना ५२ कोटी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या आॅर्बिट्स ग्रुपचे व्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

Pujit Agarwal's custody extended | पुजीत अगरवालच्या कोठडीत वाढ

पुजीत अगरवालच्या कोठडीत वाढ

Next

मुंबई : फ्लॅटमध्ये गुंतवणूक केलेल्या नऊ गुंतवणूकदारांना ५२ कोटी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या आॅर्बिट्स ग्रुपचे व्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुजीत अगरवाल याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने १ आॅक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. अगरवालला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
आॅर्बिट टेरेस आणि आॅर्बिट सेव्हन या दोन इमारतींमधील एकूण ९ सदनिकांमध्ये गुंतवणूक केल्यास त्या बदल्यात २४ महिन्यांनंतर ही रक्कम अथवा सदनिका देण्याचे आमिष अगरवाल याने अशोककुमार अगरवाल यांना दाखविले होते. मात्र अगरवाल यांनी रक्कम किंवा सदनिका न देता ५२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अशोक यांनी करीत २७ एप्रिलला आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. यावरून गुन्हा दाखल करीत आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तपासादरम्यान पावणेतीन कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी अगरवालला अटक केली. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत होताच आर्थिक गुन्हे शाखेने अगरवालचा ताबा घेत त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Pujit Agarwal's custody extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.