मुंबई : राज्यभरात १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या दरम्यान १ हजार ३२७ जणांना एड्सची लागण झाल्याने मृत्यू ओढावला. याच कालावधीत मुंबईत एड्समुळे ११६ जणांचा, तर पुण्यात १३१ बळी गेले आहेत, अशी माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली या संकेतस्थळावरून समोर आली आहे. एड्समुळे दगावलेल्यांच्या संख्येत पुण्याचा प्रथम, तर मुंबईचा दुसरा क्रमांक लागतो. अहमदनगर तिसºया क्रमांकावर असून, तिथे ८७ बळी आहेत.राज्यात जर ११ मृत्यू एचआयव्हीमुळे होत असतील, तर त्यापैकी १ मृत्यू मुंबईत होतो, अशी माहिती या संकेतस्थळावर नमूद करण्यात आली आहे. एकट्या एप्रिल महिन्यात राज्यात १८ मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत राज्यात १ हजार ३९० जणांचा बळी यात गेला, तर मुुंबईत ७२ जणांचा मृत्यू झाला. एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत राज्यात एड्सने मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजार ४२६ एवढी होती. या कालावधीत मुंबईत २७ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार, राज्यात ४ हजार १४३ आणि मुंबईत २१५ लोकांचा एड्समुळे मृत्यू झाला आहे, तर २०१६-१७ साली आंध्र प्रदेश येथे १ हजार ९७८ जणांचा बळी गेला. त्यानंतर, कर्नाटकात १ हजार ६७४ जणांचा, तर राज्यात एड्सची लागण होऊन १ हजार ३९० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.मुंबईला सर्वाधिक निधीएड्सच्या निर्मूलनासाठी जनजागृतीचे कार्यक्रम राबविले जातात. मुंबईला एड्स निर्मूलनासाठी जास्तीचा निधी दिला जातो, पण तरीही ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय, मुंबईत गावाकडून येणाºयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एचआयव्हीचे संक्रमण होण्याची शक्यता टाळता येत नाही, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी दिली.
एड्समुळे दगावणाऱ्यांत पुणे प्रथम, तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 1:18 AM