Join us

पुणे-मुंबई रेल्वे रविवारपर्यंत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 3:01 AM

मंकी हिलजवळ रेल्वेमार्गावर कोसळलेली दरड काढण्यास तीन-चार दिवस लागणार

पुणे : घाटक्षेत्रात मंकी हिलजवळ रेल्वेमार्गावर कोसळलेली दरड काढण्यास तीन-चार दिवस लागणार असल्याने पुणे-मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतूक रविवारपर्यंत (दि. ११) बंद ठेवण्यात येणार आहे. कोल्हापूरला जाणाऱ्या महालक्ष्मी व सह्याद्री एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.मुसळधार पावसामुळे शनिवारी (दि. ३) रात्री मंकी हिलजवळ दरड कोसळली आहे. तेव्हापासून पुणे-मुंबईदरम्यानची रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. रद्द न केलेल्या मुंबईच्या दिशेने जाणाºया काही रेल्वेगाड्या पुण्यापर्यंत धावणार आहेत. तर काही गाड्या दौंड ते मुंबईदरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या पुणे किंवा दौंड स्थानकातून नियमित वेळेनुसार सोडण्यात येतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.या गाड्या केल्या रद्दडेक्कन क्वीन, इंद्रायणी एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, पुणे-पनवेल-पुणे पॅसेंजर, सोलापूर-मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस, मुंबई-पंढरपूर-मुंबई पॅसेंजर, मुंबई-कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, हुबळी-मुंबई एक्स्प्रेस, हैदराबाद-मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस (दि. १२ पर्यंत), मुंबई-चेन्नई-मुंबई एक्स्प्रेस (दि. १० पर्यंत)

टॅग्स :रेल्वे