'पुण्याप्रमाणे मुंबईतही हॉटेलच्या वेळा वाढवण्याचा निर्णय लवकरच घेणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 09:45 PM2021-10-16T21:45:28+5:302021-10-16T21:46:49+5:30
राज्यात गेले काही दिवस कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या वेळा मध्यरात्री 12 पर्यंत करण्याची मागणी त्यांच्या असोसिएशनकडून सरकारला करण्यात आली आहे.
मुंबई - कोरानाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आता कोविडचे निर्बध शिथील करण्यात येत आहेत. पुण्यानंतर मुंबईतहीहॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या वेळा वाढवण्यासंबंधी निर्णय घेण्यात येत आहे. मुंबईतही हॉटेल्स व रेस्टॉरंटच्या वेळा वाढवण्या संदर्भात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे सूचक वक्तव्य मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी केले आहे.
राज्यात गेले काही दिवस कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या वेळा मध्यरात्री 12 पर्यंत करण्याची मागणी त्यांच्या असोसिएशनकडून सरकारला करण्यात आली आहे. मुंबईत सध्या हॉटेल्स व रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरू आहे. त्यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या वेळा मध्यरात्री 12 पर्यंत करण्यासंदर्भात टास्क फोर्सशी आणि कॅबिनेटमध्ये चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्रीमहोदयांनी दिली.
पुण्याप्रमाणे मुंबईतही आता हॉटेलच्यावेळा वाढवण्याचा निर्णय लवकर घेणार - अस्लम शेख pic.twitter.com/2DjAhcrVXg
— Lokmat (@MiLOKMAT) October 16, 2021