पुणे, नाशिक, कोल्हापूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 06:05 AM2020-09-30T06:05:19+5:302020-09-30T06:05:27+5:30

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम; ८ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे सर्वेक्षण

Pune, Nashik, Kolhapur have the highest number of corona patients | पुणे, नाशिक, कोल्हापूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

पुणे, नाशिक, कोल्हापूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

Next

मुंबई : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत आतापर्यंत राज्यातील ८ कोटींहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण झाले असून, या सर्वेक्षणात पुणे, नाशिक, कोल्हापूरमधून सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले.

ठाणे भागामधून २१ टक्के, नाशिक भागामधून १० टक्के, पुणे १८ टक्के, कोल्हापूर १५ टक्के, औरंगाबाद १२ टक्के, लातूर १३ टक्के, अकोला १३ टक्के आणि नागपूर भागामधून ६ टक्के इतक्या कुटुंबांचे सर्वेक्षण झाल्याचे समजते. सुमारे २४ लाख कुटुंबाना पथकांनी भेटी दिल्याचे ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी या मोहिमेच्या जिल्हा परिषदांमार्फत होत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या मोहिमेला अधिक परिणामकारक करा, तसेच अधिकाधिक लोकांना यात सहभागी करून घ्या, असे सांगितले. यात सारी, आयएलआयच्या १५ हजार ३९२ रुग्ण तर कोरोनाचे ६, ९३८ रुग्ण आढळले. सहव्याधी असलेले २ लाख ६ हजार २११ व्यक्ती आढळल्या. ही मोहीम केवळ सरकार राबवत नसून लोकांची आहे. आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे, या दृष्टीने जनजागृती करा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: Pune, Nashik, Kolhapur have the highest number of corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.