Pune Rain: महापालिकेत, केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची सत्ता असताना असे का घडले? - शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 07:18 AM2019-09-27T07:18:38+5:302019-09-27T07:19:13+5:30

पुण्यातील या परिस्थितीला एका रात्रीतला पाऊस जबाबदार आहे की, पुणे महापालिकेचे बेजबाबदार प्रशासन आणि नोकरशाही यास कारणीभूत आहे, यावर आता चर्चा झडायला हवी.

Pune Rain: 'Why did this happen when there was one party in the municipality, the center and the state?' Shiv Sena Criticized BJP | Pune Rain: महापालिकेत, केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची सत्ता असताना असे का घडले? - शिवसेना

Pune Rain: महापालिकेत, केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची सत्ता असताना असे का घडले? - शिवसेना

Next

मुंबई - पुणे महापालिकेत, राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाची सत्ता असतानाही असे का घडले? स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली वेडेवाकडे प्रयोग करण्याचा सपाटा पुण्यात सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना ठेकेदारी आणि आरक्षणे उठविण्यातच अधिक रस आहे. मुंबई पाण्यात गेल्यानंतर पुण्यात आरामखुर्चीत बसून टीकेच्या बाकरवडय़ा तोडणाऱ्यांनी आता पुणे का बुडाले यावरही थोडे चर्वितचर्वण करायला काय हरकत आहे? अशा शब्दात शिवसेनेने सत्ताधारी भाजपावर टीका केली आहे. 

पुण्यातील या परिस्थितीला एका रात्रीतला पाऊस जबाबदार आहे की, पुणे महापालिकेचे बेजबाबदार प्रशासन आणि नोकरशाही यास कारणीभूत आहे, यावर आता चर्चा झडायला हवी. गेल्याच महिन्यात कोल्हापूर, सांगलीत कृष्णा, पंचगंगेस पूर आला तेव्हा पावसाच्या पाण्याने नदीचे पात्र फुगले अन् गावेच्या गावे पाण्यात बुडाली. मात्र पुण्यात मुळा, मुठा नद्यांची पात्रे आटोक्यात असतानाही रस्त्यारस्त्यांवर पूर आला असं शिवसेनेनं म्हटलं आहे. 

सामना अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे 

  • वास्तविक पुणे शहराची नैसर्गिक रचनाच अशी आहे की, कितीही पाऊस पडला तरी पाणी नाला-ओढय़ातून नदीपात्रात वाहून जाऊ शकते पुणे शहरात बुधवारी झालेल्या ढगफुटीसारख्या पावसाने एका रात्रीत जी दाणादाण उडवली ती थरारकच होती. 
  • वास्तविक गेले काही दिवस पुण्यात पावसाने ‘रात्रीस खेळ चाले’चाच प्रयोग सुरू केला आहे. दिवसा कडकडीत ऊन आणि सायंकाळी सातनंतर दे दणादण पाऊस! बुधवारी सायंकाळी तर पावसाने भयंकरच रौद्ररूप दाखवले. त्यामुळे पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले. पुणे तिथे काय उणे अशी अभिमानाने हाळी देणाऱ्या पुणेकरांची बोबडी पावसाने वळविली. 
  • बुधवारी सायंकाळी आठनंतर दोन तासात ढगफुटीसारखा पाऊस झाला. पुण्याच्या नकाशावर कुठेही बोट ठेवले तरी तिथे कमरेइतके पाणी साठलेय अशी परिस्थिती होती. मध्यभागातील पेठांमध्ये, इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले होते. 
  • कात्रजपासून सिंहगड रोडपर्यंत अवघे पुणे जलमय झाले. पेठांच नव्हे तर आयटी पार्क म्हणविणारा हिंजेवाडी परिसरही पाण्यात गेला. 
  • 12 जणांचे बळी चार तासांत गेले आणि हजारो पुणेकरांनी संपूर्ण रात्र भेदरलेल्या अवस्थेत काढली. पुण्याने जणू ‘मिनी केदारनाथ’ म्हणावा असा प्रलय पाहिला. रस्त्यावर हाहाकार उडालेला असताना कुठलीच सरकारी यंत्रणा मदतीला नव्हती. 

Image result for Pune rain

  • स्थानिक लोकच या अस्मानी संकटाशी सामना करत होते. मध्यरात्री दीड-दोननंतर अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान मदतीसाठी पोहचू शकले. इतकी भीषण पूरस्थिती पुण्याने आजवर कधीच बघितली नव्हती.
  • इथे मुंबई शहरासारखे चहूबाजूने समुद्र आणि खाडीने वेढलेय अशी परिस्थिती नाही की भरतीचे पाणी शहरात घुसण्याची भीती नाही. वेडेवाकडे प्रयोग करण्याचा सपाटा पुण्यात सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना ठेकेदारी आणि आरक्षणे उठविण्यातच अधिक रस आहे. 

Web Title: Pune Rain: 'Why did this happen when there was one party in the municipality, the center and the state?' Shiv Sena Criticized BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.