Join us

पुण्यातील विकृताने कापले श्वानाचे कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:05 AM

श्वानाचा पुणे ते मुंबई प्रवास, प्राणीमित्राच्या सतर्कमुळे घटना उघडचेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,पुण्यातील विकृताने कापले श्वानाचे ...

श्वानाचा पुणे ते मुंबई प्रवास, प्राणीमित्राच्या सतर्कमुळे घटना उघड

चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,

पुण्यातील विकृताने कापले श्वानाचे कान

चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; श्वानाचा पुणे ते मुंबई प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एक जण कारमधून अमेरिकन पिटबुल जातीचे कान कापलेले श्वानाचे पिल्लू दादरच्या दिशेने घेऊन जात असल्याचा कॉल पोलीस नियंत्रण कक्षात येताच, त्यांनी नाकाबंदी करून वाहनचालकाला ताब्यात घेतले. चौकशीत पुण्यातील अखिलेश जाधव नावाच्या व्यक्तीने या श्वानाचे कान कापल्याची माहिती सामोर आली. याप्रकरणी गुन्हा नोंदवत चेंबूर पोलिसांनी ताे पुढील तपासासाठी पुणे पोलिसांकडे वर्ग केला. प्राणिमित्राच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली.

चेंबूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १० वाजता प्राणिमित्र आनंद शोभित मोहिते यांनी फोनद्वारे माहिती दिली की, ते पुणे ते मुंबई असा प्रवास करत असलेल्या कारमधून त्या कारचा चालक अमेरिकन पिटबुल जातीचे कान कापलेले श्वानाचे पिलू दादरच्या दिशेने घेऊन जात आहे.

पोलिसांनी तात्काळ डायमंड गार्डन, चेंबूरजवळ, सायन ट्रॉम्बे हायवे येथे नाकाबंदी करून कारचालकाला ताब्यात घेतले. या कारमध्ये कान कापलेले पिलू सापडले. चालकाकडे चौकशी केली असता, ते पिलू पुणे येथे राहणारा अखिलेश विशाल जाधव (३५) याने धनंजय गायकवाड यांना देण्यासाठी दिल्याचे उघडकीस आले. तपासात जाधवने पुण्यातच पिलाचे कान कापल्याचे समाेर आल्याने मोहिते यांच्या तक्रारीवरून जाधव विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

जखमी श्वानाला परेलच्या प्राणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटना पुण्याच्या मुंढवा भागात घडल्यामुळे हा गुन्हा मुंढवा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, जाधवने असे का केले? याबाबत पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.

...........................................................