पुण्याच्या एसटी फेऱ्या दुपटीने वाढविल्या

By admin | Published: August 30, 2016 10:58 PM2016-08-30T22:58:59+5:302016-08-30T23:56:14+5:30

गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावाकडे : मुंबईला दहा फेऱ्या वाढविल्या; आॅनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध

Pune's ST Round has doubled | पुण्याच्या एसटी फेऱ्या दुपटीने वाढविल्या

पुण्याच्या एसटी फेऱ्या दुपटीने वाढविल्या

Next

सातारा : नोकरी-व्यावसाय, उच्च शिक्षणाच्या निमित्ताने घर, गाव सोडावे लागलेल्यांना एकत्र आणण्याचे काम गौरी-गणपतीचा सण करतो. सणासाठी प्रत्येकाला सुखरुप गावी जाता यावे यासाठी एसटी महामंडळाच्या सातारा विभागाने विशेष नियोजन केले आहे. पुण्याला दर पंधरा मिनिटाला एक फेरी सोडण्यात येणार आहे.
नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने गाव सोडण्याशिवाय पर्याय नसतो. अशांना प्रत्येक सणाला गावाकडची आठवण येते पण जाणं शक्य नसतं. त्यामुळेच आपल्याकडे गौरी-गणपती अन् दिवाळीला सर्व भावंडं एकत्र येतात. साहजिकच या सणाची सर्वजण वाट पाहत असतात.
सातारकरांना पुणे, मुंबईहून गावी येण्यासाठी एसटीशिवाय पर्यायच नसतो. हाच धागा पकडून राज्य परिवहन महामंडळाच्या साताऱ्याच्या विभाग नियंत्रण अमृता ताम्हणकर यांनी नियोजन केले आहे.
गणेश स्थापना सोमवार, दि. ५ रोजी असणार आहे. त्यामुळे रविवारपासूनच लोक मुंबईहून निघू शकतात. याचा विचार करुन साताऱ्यातील गाड्या तीन तारखेलाच मुंबईला जाणार आहेत. रविवार आणि सोमवारी त्या पुन्हा येणार आहेत.
त्याचप्रमाणे गौरी आगमन अन् विसर्जनच्या दिवशी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. अनंत चतुर्थीनंतरही गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. मुंबईला जाणाऱ्या गाड्या आगाऊ आरक्षणसाठी आॅनलाईन सोडल्या आहेत. या गाड्यांचे संगणकावर आरक्षण करता येणार आहे. या काळात साताऱ्यातून पुण्याला दररोज सुमारे पन्नास विनाथांबा गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची संख्या वाढल्यास आवश्यकतेनुसार गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी खासगी प्रवासी वाहतुकीचा वापर न करता राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांचा वापर करावा, असे आवाहन ताम्हणकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

मुंबई-चिपळूण व्हाया सातारा
कोकणवासीयांसाठी गौरी-गणपतीच्या सणाचे महत्त्व वेगळेच आहे. प्रत्येक कोकणवासी गणपतीसाठी मुंबईहून कोकणात जातात. त्यासाठी जादा गाड्या सोडल्या जातात. सातारा विभागानेही शंभर गाड्या मदतीला दिल्या आहेत. गेल्या महिन्यात महाड येथील सावित्रीनदीवरील पूल वाहून गेल्याने त्या मार्गावरील एसटी वाहतूक बंद केली आहे. मुंबईहून चिपळूणला जाणाऱ्या सर्व एसटी गाड्या सातारा मार्गे जाणार आहेत. त्यामुळे या काळात वाहतुकीची कोंडी वाढण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी या सर्व गाड्या सातारा मार्गे असल्याने सातारकरांची गैरसोय काही अंशी कमी होण्यास मदतही होण्याची शक्यता आहे.


तांत्रिक तयारी
पूर्ण
सप्टेंबर महिन्यात कराव्या लागणाऱ्या एसटी बसची ‘आरटीओ पासिंग’ यंदा आॅगस्टमध्येच करुन घेतले आहे. त्यामुळे गाड्या अडकून पडणार नाहीत. तसेच सर्व गाड्यातील गाड्यांची दुरुस्ती केली जात आहे. इंजिन कामांसाठी गाड्या विभागीय कार्यशाळेत मागविल्या आहेत.


कोकणच्या सेवेत १०० गाड्या
मुंबईतील चाकरमानी गणपतीसाठी मोठ्या संख्येने कोकणात जातात. त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी सातारा विभागाने शंभर गाड्या मुंबई विभागाच्या ताब्यात दिल्या आहेत.

Web Title: Pune's ST Round has doubled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.