विनामास्क फिरणाऱ्या तरुणांना ‘मुर्गा वॉक’ची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:06 AM2021-03-31T04:06:17+5:302021-03-31T04:06:17+5:30
त्या पोलिसांवर होणार कारवाई विनामास्क फिरणाऱ्या तरुणांना ‘मुर्गा वॉक’ची शिक्षा पोलिसांवर होणार कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विनामास्क ...
त्या पोलिसांवर होणार कारवाई
विनामास्क फिरणाऱ्या तरुणांना ‘मुर्गा वॉक’ची शिक्षा
पोलिसांवर होणार कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना सोमवारी पोलिसांनी मरीन ड्राइव्ह परिसरात कोंबडा बनत चालण्याची शिक्षा दिली. ‘मुर्गा वाॅक’चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मुंबई पोलिसांनी याबाबत चौकशी करत संबंधित पोलिसांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
मुंबई पोलिसांनी आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्या २ लाखांहून अधिक जणांवर कारवाई केली आहे. मात्र, कारवाई करुनही अनेक मुंबईकर मास्क लावण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. सोमवारी मरीन ड्राइव्ह परिसरात अशाच प्रकारे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी कोंबडा बनत चालण्याची शिक्षा दिली. हा व्हिडिओ व्हायरल होताच, काही जणांनी यावर आक्षेप नोंदवला. अशा प्रकारची शिक्षा देणे योग्य नसल्याचे मत मांडले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ट्विट करुन कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करता येते, यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांनी हा व्हिडिओ सोमवारचाच असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. शिवाय, अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नसून अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगितले.