मुंबई - पंजाब नॅशनल बँकेच्या चार हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने एचडीआयएलचा प्रवर्तक सारंग वाधवान व त्याचे वडील राकेश वाधवान यांना दोन प्रकरणांत जामीन मंजूर केला.
न्या. एस. एम. मोडक यांच्या एकलपीठाने सारंग व राकेश वाधवान या दोघांनाही प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या जातमुचलका भरण्यास सांगितले. पीएमसी बँकेचे व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून बँकेची चार हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या दोघांवर आहे. ईओडब्ल्यूने ३ ऑक्टोबर २०१९ रोजी दोघांना अटक केली. १६ डिसेंबर २०१९ रोजी ईडीने या दोघांवर ईसीआयआर दाखल केला आणि जानेवारी २०२० मध्ये विशेष न्यायालयाने त्याची दखल घेतली.
सारंग आणि राकेश गेली साडेचार वर्षे कारावासात आहेत आणि खटल्याला विलंब झाला असल्याचे कारण देत न्या. मोडक यांचा जामीन अर्ज मंजूर केला. बॅंकेच्या अध्यक्षाचा जामीन मंजूर केल्याने दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला.