डिसेंबरमध्ये मुंबईत 9320 घरांची खरेदी; वर्षभरात उपनगरात सर्वाधिक प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 08:04 AM2022-01-02T08:04:39+5:302022-01-02T08:07:49+5:30

मुंबईत २०२१ मध्ये घर खरेदीचे अनेक मोठे व्यवहार पार पडले. गेल्या वर्षात डी-मार्टचे राधाकृष्णन दामानी यांनी मलबार हिल परिसरात १००१ कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता.

Purchase of 9320 houses in Mumbai in December; The highest response in the suburbs throughout the year | डिसेंबरमध्ये मुंबईत 9320 घरांची खरेदी; वर्षभरात उपनगरात सर्वाधिक प्रतिसाद

डिसेंबरमध्ये मुंबईत 9320 घरांची खरेदी; वर्षभरात उपनगरात सर्वाधिक प्रतिसाद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : यंदाच्या डिसेंबर महिन्यात मुंबईत एकूण ९,३२० घरांची खरेदी पार पडली. गेल्या महिन्याच्या तुलनेत ही घरखरेदी ते २३ टक्क्यांनी वाढली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढला. मात्र त्याचा बांधकाम क्षेत्रावर परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. 

डिसेंबर महिन्यात सुरुवातीचे २० दिवस सरासरी २९३ घरांची खरेदी पार पडली, तर शेवटच्या ११ दिवसांमध्ये दिवसाला सरासरी ३१४ घरांची खरेदी पार पडली. १,११,५५२ गेल्या वर्षभरातील मुंबईतील एकूण घरखरेदीचा एवढा आकडा झाला आहे. 

n२०२० च्या तुलनेत २०२१ च्या घरखरेदीमध्ये७० टक्क्यांनी  वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात उपनगरात सर्वाधिक घरखरेदी झाली आहे. 
nमागील वर्षभरात मुंबईतील घरखरेदीने सरकारी तिजोरीत एकूण  ६,०८९ कोटींचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला आहे.

क्षेत्रफळानिहाय घरखरेदी
n५०० चौरस फुटापर्यंत - ४२%
n५०० ते १००० चौरस फूट - ४१%
n१००० ते २००० चौरस फूट - १३%
n२००० चौरस फूटपेक्षा अधिक - ४%

एक कोटीहून कमी किंमत असणाऱ्या घरांना पसंती
n१ कोटीपर्यंत ५३%
n१ ते ५ कोटींमध्ये ४२%
n५ ते १० कोटींमध्ये ४%
n१० कोटींच्या वर २%

nमुंबईत २०२१ मध्ये घर खरेदीचे अनेक मोठे व्यवहार पार पडले. गेल्या वर्षात डी-मार्टचे राधाकृष्णन दामानी यांनी मलबार हिल परिसरात १००१ कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता. येथील सेसेन या निर्माणाधीन इमारतीत काही दिवसांपूर्वी १०३.६५ कोटी रुपयांचे २ ड्युप्लेक्स खरेदी करण्यात आले होते. तर वरळी येथे रहेजा कुटुंबीयांनी ४२७ कोटी रुपयांचे थ्री ड्युप्लेक्स घर खरेदी केले होते. त्याच इमारतीत स्मिता पारेख यांनी ५० कोटी रुपयांचे घर खरेदी केले होते. तर अमिताभ बच्चन यांनीदेखील अंधेरी येथे ३१ कोटी रुपयांचे ड्युप्लेक्स घर खरेदी केले.
 

Web Title: Purchase of 9320 houses in Mumbai in December; The highest response in the suburbs throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.