खरेदीला उधाण

By admin | Published: October 11, 2016 03:08 AM2016-10-11T03:08:48+5:302016-10-11T03:08:48+5:30

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गेल्या दोन दिवसांपासून दुकानांमध्ये बुकिंग

Purchase Spill | खरेदीला उधाण

खरेदीला उधाण

Next

नवी मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गेल्या दोन दिवसांपासून दुकानांमध्ये बुकिंग सुरु केली आहे. दसऱ्याचा हा मुहूर्त चुकू नये यासाठी चारचाकी, दुचाकी वाहनांबरोबरच घरगुती वापरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, नवीन घर खरेदी करण्यासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ग्राहकांचा वाढता कल पाहता शहरातील दुकाने, मॉल्स, दुचाकी व चारचाकी शोरुम्समध्येही आकर्षक आॅफर्स आणि मोठमोठ्या बक्षिसांनी ग्राहकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केल्याचे पहायला मिळते.
वाशीतील इनॉर्बिट मॉल, रघुलीला तसेच शहरातील नामांकित कंपनीच्या शोरुम्समध्येही मोठ्या प्रमाणात आकर्षक आॅफर्स पहायला मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर अमुकअमुक किमतीचा स्मार्ट फोन, घर सजावटीच्या वस्तू तसेच ३० ते ४० टक्क्यांची सूट अशा प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न व्यावसायिकांनी केला आहे. गेल्या आठवडाभरापासूनच चारचाकी आणि दुचाकी गाड्यांच्या बुकिंगची सुरुवात झाली आहे.
नामांकित कंपन्यांनी बुकिंगमध्येही १० ते २० टक्के सूट तसेच आकर्षक बक्षिसे अशाप्रकारे वाहनांचा खप वाढविला जात आहे. सराफांच्या दुकानांमध्येही दागिन्यांच्या बुकिंगसाठी ग्राहकांची झुंबड पहायला मिळते. (प्रतिनिधी)
सुटीच्या दिवशीही आरटीओ कार्यालय सुरु
दसऱ्याच्या आणि मोहरम या दोनही दिवशी नागरिकांना वाहन नोंदणी करता यावी याकरिता आरटीओ कार्यालय सुरु राहणार असल्याची माहिती नवी मुंबईचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली आहे.

Web Title: Purchase Spill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.