Join us

कचराकुंड्यांची खरेदी लांबणीवर

By admin | Published: August 28, 2016 4:13 AM

नगरसेवक निधीतून गृहनिर्माण संस्थांना कचराकुंड्या देण्यात येणार होत्या़ मात्र या कचराकुंड्या खरेदी करण्याचा कार्यादेश निघाल्यानंतरही ठेकेदारांनी अद्याप त्याची खरेदी केलेली नाही़

मुंबई : नगरसेवक निधीतून गृहनिर्माण संस्थांना कचराकुंड्या देण्यात येणार होत्या़ मात्र या कचराकुंड्या खरेदी करण्याचा कार्यादेश निघाल्यानंतरही ठेकेदारांनी अद्याप त्याची खरेदी केलेली नाही़ त्यामुळे गणेशोत्सव काळात कचऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे़ त्याचबरोबर ओला व सुका कचरा मोहिमेलाही हरताळ फासला जात आहे़कचराकुंडी खरेदीचा प्रस्ताव चार महिन्यांपूर्वी मंजूर झाला होता़ त्यानुसार आतापर्यंत कचराकुंड्यांचे वितरण होणे अपेक्षित होते़ मात्र अद्यापही या कचराकुंड्या विभागांमध्ये लागल्या नाहीत़ त्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे़ याबाबत विचारणाऱ्या नगरसेवकांना आणखी एक महिना कचराकुंड्यांचे वितरण होणार नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले़ओला व सुका कचरा वर्गीकरण सक्तीचे करण्यात आले आहे़ यासाठी नगरसेवक निधीतून हे डबे देण्यात येणार होते़ मात्र पालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांमध्ये ओला व सुका कचरा एकत्रित जात आहे़ वर्गीकरण न करणाऱ्या घाटकोपर, चेंबूर येथील रहिवाशांना पालिकेने नोटीस पाठविली़ परंतु पालिकाच ही सेवा देण्यात असफल ठरली असल्याची नाराजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी व्यक्त केला आहे़ (प्रतिनिधी)कचरा साठविण्याची वेगळी व्यवस्था करावी- मंडळांनी मोकळ्या जागेवरील माती, कचरा काढून घेण्याची काळजी घ्यावी. जेणेकरून गणेशोत्सवाच्या कालावधीत संपूर्ण स्वच्छता राखली जाईल. परिणामी, आरोग्यास धोका निर्माण होणार नाही. प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने मंडपाचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी आवश्यकतेनुसार कचरा साठविण्याची वेगळी व्यवस्था करावी. संपूर्ण विभाग, विशेषकरून मंडपाच्या आजूबाजूचा परिसर, रस्ते व विसर्जनाची ठिकाणे स्वच्छ ठेवावीत.निर्माल्य कलशातच संकलित करागणेशोत्सवातील सजावटीसाठी प्लास्टर आॅफ पॅरिस आणि थर्माकोलचा ऐवजी पर्यावरणपूरक कागदी मखरांनी सजावट करावी. मंडळांनी ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. जमा होणारे निर्माल्य हे निर्माल्य कलशातच संकलित करावे. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.साथीच्या आजारांचे काय? मुंबापुरीत गणेशोत्सवाचा उत्साह शेवटपर्यंत टिकावा आणि या काळात साथीचे आजार पसरू नयेत म्हणून सार्वजनिक आरोग्याबाबत प्रत्येकाने आपल्या विभागात उंदीर, डासांचा उपद्रव होणार नाही याची काळजी घ्यावी; जेणेकरून लेप्टोस्पायरोसिस व इतर साथीच्या आजारांचा फैलाव होणार नाही, असे आवाहन महापालिकेने गणेशोत्सव मंडळांना केले आहे.पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कृत्रिम तलावावर भरगणेशोत्सवात पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची मुंबई महापालिका अधिकाधिक खबरदारी घेत असून, याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रशासन गणेशमूर्तींच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांवर भर देणार आहे. याअंतर्गत गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध व्हावेत म्हणून ठिकठिकाणच्या कृत्रिम तलावांसाठी महापालिका आग्रही असणार आहे.