शेतकऱ्यांकडून तूर घेतल्याशिवाय खरेदी केंद्र बंद करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:44 AM2018-05-25T00:44:21+5:302018-05-25T00:44:21+5:30

तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्यासाठी आज पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली

The purchasing center will not be closed unless the farmers buy turmeric | शेतकऱ्यांकडून तूर घेतल्याशिवाय खरेदी केंद्र बंद करणार नाही

शेतकऱ्यांकडून तूर घेतल्याशिवाय खरेदी केंद्र बंद करणार नाही

Next

मुंबई : शेतकºयांकडून तूर खरेदी केल्याशिवाय राज्यातील खरेदी केंद्र बंद करणार नाही. लवकरच तूर खरेदीला मुदतवाढ मिळणे अपेक्षित असून शेतकºयांनी तूर खरेदीबाबत आश्वस्त राहावे, असे आवाहन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.
तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्यासाठी आज पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली. केंद्रीय कृषिमंत्र्यांसह सकारात्मक चर्चा झाली असून तूर खरेदीला मुदतवाढ देण्यास केंद्र सरकार अनुकूल आहे. लवकरच मुदतवाढीचे आदेश निघण्याची शक्यता आहे. या बैठकीला केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह केंद्रीय सचिव पटनायक, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक चढ्ढा उपस्थित होते.
राज्यात या वर्षी १ फेब्रुवारीपासून हमीभावाने तूर खरेदीला सुरुवात झाली. खरेदीचा विहीत कालावधी संपल्यानंतर १५ मेपर्यंत केंद्र शासनाने मुदतवाढ दिली होती.
मात्र या वर्षी तूर खरेदीचे उद्दिष्ट ४४ लाख क्विंटल असून त्यापैकी १५ मेपर्यंत १९३ खरेदी केंद्रांवर ३३ लाख १५ हजार १३२ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. त्यामुळे आणखी मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे.

Web Title: The purchasing center will not be closed unless the farmers buy turmeric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.