तटकरेंच्या वर्चस्वाला धक्का

By admin | Published: April 23, 2015 10:39 PM2015-04-23T22:39:51+5:302015-04-23T22:39:51+5:30

रोहा तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे पानिपत झाल्याचे निकालावरुन दिसून येत आहे. प्रतिष्ठेच्या निडीतर्फे अष्टमी ग्रामपंचायतीमध्ये

Pushing down the coast of coasters | तटकरेंच्या वर्चस्वाला धक्का

तटकरेंच्या वर्चस्वाला धक्का

Next

रोहा : रोहा तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे पानिपत झाल्याचे निकालावरुन दिसून येत आहे. प्रतिष्ठेच्या निडीतर्फे अष्टमी ग्रामपंचायतीमध्ये ११ पैकी ६ जागा जिंकून शेकाप आघाडीने वर्चस्व मिळविले आहे.
रोठ खुर्द व रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष, मनसे व सेना यांना अनुकूल कौल मतदारांनी दिल्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादीची पीछेहाट झाल्याचे दिसून येत आहे. या निकालामुळे आमदार अवधूत तटकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
निडीतर्फे अष्टमी ग्रामपंचायतीमधून शेकाप आघाडीचे उमेदवार विकास हनुमंत चोलकर, मंगेश गजानन दाभाडे, विनया गजानन चोलकर, परशुराम वामन वाघमारे, वैष्णवी रवींद्र वाघमारे, सुरेखा सूर्यकांत वाघमारे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे वैभव प्रदीप चोरगे, विजाता विजय भोई, संदीप केशव चोरगे आणि वैजयंती जगदीश पोकळे हे उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालाने निडीतर्फे अष्टमी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व संपुष्टात येऊन शेकाप आघाडीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे.
रोठ खुर्द ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच दिनेश चांगू मोरे यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष उमेदवारांच्या पॅनलने बाजी मारली आहे. करुणा रुपेश मोरे, गीता जनार्दन मोरे, दिनेश चांगू मोरे, सचिन रामचंद्र मोरे, सविता दिनेश मोरे, जनार्दन नारायण मोरे विजयी झाले आहेत.
रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांचा एका मताने पराभव करुन नितीन दत्ताराम वारंगे हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे विद्यमान सरपंच हरिभाऊ वारंगे यांच्या पत्नी प्रमोदिनी हरिभाऊ वारंगे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. त्याचप्रमाणे दोन जागा राष्ट्रवादी व अपक्ष यांनी मिळविल्या असल्या तरीही या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये तटकरे उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागले आहे तर भाई पाशिलकर समर्थकांनी बाजी मारल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Pushing down the coast of coasters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.