विधानभवनात वीर सावरकरांचे तैलचित्र लावा, खा. शेट्टींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By मनोहर कुंभेजकर | Published: May 20, 2023 03:19 PM2023-05-20T15:19:52+5:302023-05-20T15:20:39+5:30
मनोहर कुंभेजकर मुंबई - येत्या २८ मे स्वातंत्र्य वीर सावरकर जयंतीनिमित्त गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने ...
मनोहर कुंभेजकर
मुंबई - येत्या २८ मे स्वातंत्र्य वीर सावरकर जयंतीनिमित्त गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात Ekdum दिवशी स्वातंत्र्य वीर सावरकरांचे तैलचित्र लावावे अशी मागणी उत्तर मुंबईचेखासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे एका पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार असताना विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे तैलचित्र लावण्यात यावे यासाठी आपण पत्रव्यवहार करून ठराव देखील मांडला होता. पुढे दिल्लीत खासदार म्हणून गेल्यावर दिल्लीतून ही पत्रव्यवहार करून लोकसभेतील संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात ही स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे तैलचित्र लावण्यासंदर्भात मागणी केली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला जी यांना दि,२८ मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या इमारतीच्या उदघाटन निमित्ताने स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे तैलचित्र लावण्यात यावे अशी पत्राद्वारे विनंती केली असल्याचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्रात नमूद केले आहे.
आपण ही या संदर्भात विशेष रुची घेऊन महाराष्ट्राच्या विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात त्याच दिवशी स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे तैलचित्र लावावे व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना देखिल लोकसभेतील संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात देखील स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे तैलचित्र लावण्यात यावे असे विनंती पत्र पाठवावे अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांनाआपल्या पत्राद्वारे केली आहे.