मलनिस्सारण वाहिन्या टाका, नंतरच ‘स्वच्छ भारत’चे नारे द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 02:21 AM2018-05-15T02:21:58+5:302018-05-15T02:21:58+5:30

मुंबईतील मलनिस्सारण वाहिन्या जुन्या झाल्या असून, झोपडपट्ट्यांमध्ये या वाहिन्यांचे जाळेच नाही. परिणामी, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानालाच हरताळ फासला जात आहे.

Put MaliniSaran Vahiniya, only after 'Clean India' slogans! | मलनिस्सारण वाहिन्या टाका, नंतरच ‘स्वच्छ भारत’चे नारे द्या!

मलनिस्सारण वाहिन्या टाका, नंतरच ‘स्वच्छ भारत’चे नारे द्या!

Next

मुंबई : मुंबईतील मलनिस्सारण वाहिन्या जुन्या झाल्या असून, झोपडपट्ट्यांमध्ये या वाहिन्यांचे जाळेच नाही. परिणामी, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानालाच हरताळ फासला जात आहे. त्यामुळे मलनिस्सारण वाहिन्या टाकल्यानंतरच घरोघरी शौचालयाचे नारे देण्याचे
आव्हान शिवसेनेने भाजपाला दिले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरोघरी शौचालय बांधण्यास केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. यासाठी संबंधितांना आर्थिक मदतही केली जाते. मात्र, मुंबईत अनेक भागांमध्ये मलनिस्सारण वाहिन्या जुन्या आहेत, तर काही ठिकाणी हे जाळेच नाही. त्यामुळे शौचालय बांधले तरी त्याचे सांडपाणी सोडणार कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला.
अ‍ॅण्टॉप हिल येथे २९ इमारतींची वसाहत आहे. मात्र, या वसाहतीत मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे अपुरे असल्याने शौचालयाचे सांडपाणी रस्त्यावर येते. त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. येथे नव्या मलनिस्सारण वाहिन्या टाकाव्यात, तसेच जुन्या वाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी सदस्यांनी या बैठकीत केली. प्रशासनाने यावर स्पष्टीकरण देईपर्यंत स्थायी समितीने हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला आहे.
>शिवसेनेने उपस्थित केला मुद्दा
मुंबईत अनेक भागांमध्ये मलनिस्सारण वाहिन्या जुन्या आहेत, तर काही ठिकाणी हे जाळेच नाही. त्यामुळे शौचालय बांधले तरी त्याचे सांडपाणी सोडणार कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला.

Web Title: Put MaliniSaran Vahiniya, only after 'Clean India' slogans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.