Join us

पीडब्ल्यूडीने व्यावसायिक संस्थेप्रमाणे काम करावे - हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 6:18 AM

सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) मानसिकता बदलून व्यावसायिक संस्थेप्रमाणे काम करावे, असे मत हायकोर्टाने एका याचिकेच्या सुनावणीत काहीच दिवसांपूर्वी व्यक्त केले.

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) मानसिकता बदलून व्यावसायिक संस्थेप्रमाणे काम करावे, असे मत हायकोर्टाने एका याचिकेच्या सुनावणीत काहीच दिवसांपूर्वी व्यक्त केले.माझगाव न्यायालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. पी. डी. नाईक यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला धारेवर धरले. न्यायालयाची नवी इमारत बांधण्यास पीडब्ल्यूडीला साहाय्य करणाऱ्या तांत्रिक तज्ज्ञांकडून धडे घ्यावेत. तरच त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होईल. त्यांनी व्यावसायिक संस्थेप्रमाणे वागावे, असे कोर्टाने म्हटले. माझगाव न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करण्याचा आदेश सरकारला द्यावा, अशी याचिका माझगाव बार असोसिएशनने हायकोर्टात केली. या सुनावणीत कोर्टाने पीडब्ल्यूडीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.