कोरोना अहवालावर क्यूआर कोड बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:06 AM2021-05-20T04:06:13+5:302021-05-20T04:06:13+5:30

आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी नियम; शनिवारपासून अंमलबजावणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना अहवालावर क्यूआर कोड नसल्यास आता विमान प्रवास ...

QR code binding on Corona report | कोरोना अहवालावर क्यूआर कोड बंधनकारक

कोरोना अहवालावर क्यूआर कोड बंधनकारक

Next

आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी नियम; शनिवारपासून अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना अहवालावर क्यूआर कोड नसल्यास आता विमान प्रवास करता येणार नाही. येत्या २२ मेपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हा नियम लागू केला जाणार आहे.

कोरोना अहवालात फेरफार करून विमान प्रवास केला जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने उपरोक्त निर्णय घेतला आहे. क्यूआर कोडच्या मदतीने प्रयोगशाळा आणि अहवाल या दोघांची वैधता तपासली जाणार आहे.

अहवालावरील तारीख बदलणे, नाव आणि अन्य मजकुरात फेरफार करून पॉझिटिव्ह रुग्णांनी विमान प्रवासाचा प्रयत्न केल्याच्या घटना मुंबईसह अनेक विमानतळांवर उघडकीस आल्या. त्यामुळे वर्दळीच्या विमानतळांनी आरटी-पीसीआर अहवाल असलेल्या प्रवाशांचीही रँडम तपासणी करण्याचा निर्णय घेतला. काही संशयित प्रवाशांची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह निघाले. त्यांची अधिक चौकशी केली असता जुन्या अहवालात फेरफार केल्याचे समोर झाले. परिणामी अहवालाची सत्यता पडताळण्यासाठी क्यूआर कोड बंधनकारक करण्यात आला आहे. सुरुवातीला आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हा नियम बंधनकारक केला जाईल. देशांतर्गत प्रवासासाठीही अशा प्रकारची नियमावली लागू करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती विमानतळावरील सूत्रांनी दिली.

* क्यूआर कोडमुळे काय समजणार?

- संबंधित व्यक्तीचा नमुना कोणत्या दिवशी घेतला?

- अहवाल कधी दिला? त्यातील खरा निष्कर्ष काय?

- प्रयोगशाळा मान्यताप्राप्त आहे का?

- अहवालात फेरफार केला आहे का?

* ...तर विमानात प्रवेश नाही!

२२ मेपासून आंतरराष्ट्रीय प्रवासाकरिता क्यूआर कोडसहीत कोरोना निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाची पूर्तता न करणाऱ्यांना विमानात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी कोरोना चाचणी करताना संबंधित प्रयोगशाळेकडे क्यूआर कोड आधारित अहवाल मागावा, अशी सूचना एअर इंडियाने केली आहे.

........................................

Web Title: QR code binding on Corona report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.