४७७ प्रवाशांना केले क्वारंटाइन, पालिकेची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:06 AM2020-12-29T04:06:58+5:302020-12-29T04:06:58+5:30

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी युरोप व मध्य पूर्व देशातून एकूण ११ विमाने मुंबईत दाखल झाली ...

Quarantine done to 477 passengers, information of the municipality | ४७७ प्रवाशांना केले क्वारंटाइन, पालिकेची माहिती

४७७ प्रवाशांना केले क्वारंटाइन, पालिकेची माहिती

Next

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी युरोप व मध्य पूर्व देशातून एकूण ११ विमाने मुंबईत दाखल झाली आहे. त्यातून एकूण ८६८ प्रवासी आले, त्यातील ४७७ प्रवाशांना मुंबईत क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर अन्य ३८५ प्रवाशांची त्या-त्या राज्यात रवानगी करण्यात आली आहे. तर सहा जणांना प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे.

इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळल्यामुळे २१ डिसेंबर २०२० पासून मुंबईत येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी व त्यांना क्वारंटाइन केले जात आहे. मात्र सावधगिरी म्हणून महिनाभराच्या कालावधीत मुंबईत आलेल्या परदेशी प्रवाशांचीदेखील तपासणी पालिकेने सुरू केली आहे. पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयातील दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारपासून त्या त्या विभागातील प्रवाशांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करीत आहेत.

Web Title: Quarantine done to 477 passengers, information of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.