वांद्रे भाभा रुग्णालयातील १५ कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 06:58 PM2020-04-08T18:58:55+5:302020-04-08T18:59:21+5:30

रुग्णालयात कोरोना रुग्णाचा मृत्यू

Quarantine made to 15 employees at Bandra Bhabha Hospital | वांद्रे भाभा रुग्णालयातील १५ कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाइन

वांद्रे भाभा रुग्णालयातील १५ कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाइन

Next

मुंबई - वांद्रे येथील भाभा रुग्णालयात बुधवारी सकाळी एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना क्वारेन्टाईन करण्याची मागणी केली. त्यामुळे त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या १५ कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.

भाभा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने मुख्य वैद्यकीय अधिकऱ्यांची भेट घेत सर्वांना क्वारंटाइन करण्याची मागणी केली. कर्मचाऱ्यांनी क्वारंटाइन करण्याची मागणी लावून धरली, याकरिता तासभरात रुग्णालयाच्या आवारात कर्मचाऱी जमले होते. अखेर प्रशासनानकडे मागणी लावून धरल्यानंतर या कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन कऱण्याचा निर्णय घेण्यात आला.

सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्याऐवजी त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नमुने घेऊन त्यांना क्वारेन्टाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रुग्णालयातील १५ कर्मचाऱ्यांचे नमुने घेऊन त्यांना रुग्णालयातच क्वारंटाइन करण्यात आले. यापूर्वीही, शहर उपनगरातील पालिका, शासकीय व खासगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही समस्या समोर आली आहे. जीव धोक्यात घालून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Quarantine made to 15 employees at Bandra Bhabha Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.